‘या’ महत्वाच्या मशीनसाठी फ़क़्त चीन हाच पर्याय; मग कसे होणार आपण आत्मनिर्भर..!

मोबाइल किंवा स्मार्ट टेक्नोलॉजी यासाठी भारत अजूनही किमान ६५ % चीनवर अवलंबून आहे. तर, बँकेत वापरल्या जाणाऱ्या पिओएस मशीनबाबत भारत किमान ९५ टक्के चीनवर अवलंबून आहे. होय, कोणालाही खोटं वाटत असलं तरी हे वास्तव आहे. मुजोर चीनकडून आपण सर्वाधिक खरेदी करतो ती बँक पिओएस मशीन आणि कॅमेरे. कॅमेरे वापरून तर आपण सगळे थेट चीनला आपली माहिती देण्याचा मार्ग तर खुला करीत नाहीत ना, अशी स्थिती आहे. त्यामुळेच हे दोन्ही उत्पादने भारतात बनणे आणि रिप्लेस करून घेणे ही गरज आहे.

रिझर्व बँक आणि सरकारी यंत्रणांनी डिजिटल पेमेंटच्या सेवेला महत्व दिले आहे. मात्र, त्यासाठी वापरले जाणारे पैसे जरी भारतीय असले तरी त्याचे स्वाईप करण्याचे यंत्र (पॉइंट ऑफ सेल मशीन) मात्र चीनी आहे. जगभरात या मार्केटमध्ये चीन्यांचा वाटा ९० टक्के आहे. चीनसह अमेरिका (वेरीफोन), फ्रांस (इंजेनिको) आणि हॉंगकॉंग (पैक्स टेक) यांच्या कंपन्या असे मशीन विकतात. त्यातील सर्व बनतात ते चीनमध्ये. इतरही देशाच्या कंपन्या असे यंत्र देतात. मात्र, त्यांचा रेट चीनी बनावटीच्या वस्तूंपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे भारतात सर्रास तेच यंत्र वापरले जातात.

भारतात यापुढे फ़क़्त सोफ्टवेअर नाही, तर हार्डवेअर बनवण्यासाठी खास प्रकल्प व योजना राबवण्याची गरज आहे. चीन हा मुजोर शेजारी आहे. त्यामुळे त्याला नामोहरम करण्यासाठी व्यावसायिकता दाखवतानाच नसरकारी यंत्रणांना वीन उद्योजकांच्या पायात बेड्या घालण्याचे धोरण सोडावे लागणार आहे.

भारतात एखादी कल्पना व्यावसायिक स्वरुपात आणण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा मदत करीत नाही. उलट झालाच तर त्यात कोलदांडा घालतात. अशावेळी यंत्रणा तीच असताना केंद्र सरकार व जनतेला भारत आत्मनिर्भर व्हावा असे वाटत आहे. ते कितीही योग्य असले तरीही सरकारी यंत्रणा त्याला किती प्रतिसाद देतील त्यावर याचे भवितव्य ठरणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here