वाघांनी सांगितला कॉंग्रेसच्या ‘त्या’ ३ मुद्द्यांचा अर्थ; पहा काय म्हटलेय त्यावर जनतेने

भाजपचे महाराष्ट्र राज्यातील प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आज कॉंग्रेसच्या तीन मुद्यांचा अर्थ सांगणारे एक महत्वाचे ट्विट केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये चरखा, खादी आणि कायद्याचे बोला या तीन मुद्यांचा अर्थ एकूण भारतीय परिप्रेक्षात सांगताना कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.

त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, कॉंग्रेसची ३ महत्त्वाची तत्वे १. #चरखा कॉंग्रेसवाल्यांना वाटले ‘चर आणि खा’ २. #खादी कॉंग्रेसवाल्यांना वाटले ‘खा आधी’ ३. #कायद्याने_बोला कॉंग्रेसवाल्यांना वाटले ‘काय तरी द्या मग बोला’

 एकूण देशभरात फ़क़्त कॉंग्रेस नाही तर सर्वच राजकीय पक्ष आणि जनताही हाच अर्थ काढून देशाला ओरबाडत आहे. फ़क़्त त्यांच्या टक्केवारीत काय तो फरक असेल. वाघ यांच्या या मुद्याला अनेकांनी समर्थन दिले आहे. तर, काहींनी त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा ‘अपयशी’ (कारण ते कोणाचेही ऐकून घेत नाहीत) प्रयत्न करून पाहिला आहे. तर काहींनी अनावश्यक ट्रोल केले आहे.

अमेय सावंत यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अवधूत वाघांची ३ महत्त्वाची तत्वे १. #कॅलेंडर फायदा दिसेल तिथे जायचं, तत्व विचारांचे कपडे कॅलेंडर प्रमाणे दरवर्षी बदलतात. २. #फिरस्ता सगळ्या पक्षात जावून फिरून यायची सवय. त्यामुळे ट्रॅव्हल ची गोडी ३. #सतरंजी फोटो सतरंजी उचलताना जास्त दिसेल, सतरंजी बनवण्याच्या उद्योगाचे स्वप्न

तर, पांडू तात्या नावाच्या फेक आयडीवरून  म्हटले आहे की, वाघ साहेबांची महत्त्वाची तीन तत्वे १.#सतरंजी दिसेल त्या नेत्याची सतरंजी उचलून ठेवणे २.#चहाचे_ग्लास_उचलणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चहा पाण्याची सोय करणे वाघसाहेबांसाठी अतिशय महत्वाची काम.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here