शत्रूच्या मनसुब्यांना वेळीच धुळीत मिळवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे. दि. १५ जून २०२० च्या रात्रीच्या घटनेतही त्याचीच साक्ष पटली होती. भारतीय हद्दीत घुसू पाहणाऱ्या चीनी सैनिकांना वेळीच रोखताना त्यांचे ८० सैनिक मारण्याचा पराक्रम भारतीय सैनिकांनी केला होता. आताही अशाच पद्धतीने चीन ज्या भागात घुसखोरी करण्यासाठी पुढे येऊ शकतो त्या भागातील महत्वाच्या ठिकाणांवर भारतीय सैन्याने अगोदरच आपला हक्क सांगितला आहे.
याबाबत चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्राने लेख लिहिला आहे. त्यात भारतीय सैन्याने चीनच्या भागात अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकूणच चीनच्या भागात भारतीय सैन्य असल्याचे आता चीननेच काबुल करून टाकले आहे. त्या घटनेने चीनचा तिळपापड झाला आहे. अशा पद्धतीने भारतीय सैन्य जर घुसणार असेल तर तिथे भारतीयांच्या पराभवानेच हा विषय संपेल अशी भाषा त्या लेखात केलेली आहे. एकूणच भारतीय सैन्यानेही चीनी भागात गेल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. मात्र, द टेलिग्राफ नावाच्या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने भारतीय सैन्याने वेळीच महत्वाची कारवाई केल्याची ब्रेकिंग न्यूज दली आहे.
बातमीत म्हटले आहे की, फिंगर ४ या पहाडावर चीनी सैनिक उंचीचा फायदा घेण्यासाठी बसलेले आहे. आता ते साउथ बँक भागातही असाच प्रयत्न करणार असल्याची खबर भारतीय सैनिकांना लागली. मग भारतीय सैन्याने तातडीने कार्यवाही करून साउथ बँक भागातील उचावरील ठिकाणांवर आपले जवान तैनात करून टाकले आहेत. त्याने मुजोर चीनलाही मोठा शह देण्यात यश आलेले आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीनी मुखपत्रातून आता धमकीवजा लेखन सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
संपादन : सचिन पाटील