वॉरेन बफे वाढदिवस : चिंगम विकणारा बनला नंबर वन रिच मॅन; वाचा इन्व्हेस्टमेंट गुरूंची गोष्ट

पैसे कमवायला शोर्टकट लागतो, लक लागतो किंवा कोणत्यातरी महाभागांचा वरदहस्त लागतो, अशीच भारतीय सामान्य जनतेची धारणा आहे. होय, भारतातील सामाजिक, राजकीय कारभार आणि एकूण आर्थिक क्षेत्रातील जाण लक्षात घेता ते योग्यही वाटते. परंतु, ग्लोबल विचार करणाऱ्या अमेरिका व युरोपात त्याची गरज नसते. तिथे आपल्या कर्तुत्वाला पंख फुटले आणि त्याला जिद्दीची जोड मिळाली की काय होते हे आपण आजही पाहतो. तिथल्या कंपन्यांची एकूण झेप, आणि त्यांचा आवाका लक्षात घेतल्यास स्पर्धात्मकतेचे महत्व पटते. अशाच जगात जन्म घेऊन जगाचे डोळे दिपवणारे यश मिळवलेले अवलिया म्हणजे वॉरेन बफे (Warren Buffett) .

डोक्यालिटी ठरली महत्वाची

होय, वाचक मित्र-मैत्रिणींनो, वॉरेन बफे म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांचे लाडके इन्व्हेस्टमेंट गुरू. आज त्यांचा वाढदिवस. वयाच्या नव्वदीतही त्यांचा मार्केटमधील आब आणि रुबाब कायम आहे. आपल्या एकूण संपत्तीतील तब्बल ८५ टक्के दानधर्म करणारा हा जागतिक कर्ण म्हणूनच अनेकांसाठी दंतकथा बनला आहे. इन्व्हेस्टमेंट गुरू बनण्याचा बफे यांचा प्रवास काही साधा-सोपा नाही. त्यासाठी त्यांनी अभ्यास, जिद्द आणि चिकाटी यासह धोरण ठरवून केलेली गुंतवणूक कामाला आलेली आहे. कष्ट करून श्रीमंत होण्याच्या गप्पा मारणाऱ्यांच्या देशात आपण असतो. इथे गरबी विकून सहानुभूती मिळवली जाते आणि आपले छोटेखानी इप्सित साध्य केले जात. मात्र, बफे आणि त्यांची अमेरिका त्याच्या पल्याड गेलेले आहेत. कष्ट करणे वाईट नाही. गरज पडल्यावर असे सगळेच करावे लागते. त्याची तयारी ठेऊन पुढे जायची उर्मी लागते. बफे त्याच जातकुळीतले. ते कष्ट करून जागले मात्र डोक्यालिटी लावून जगातील सर्वाधिक श्रीमंत बनले.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

  वयाच्या १४ व्या वर्षी भरला होता आयकर

  १९३० मध्ये आजच्याच तारखेला त्यांचा जन्म झाला. ब्लूमबर्ग बिलियेनियर इंडेक्स यांच्यानुसार सध्या बफे हे ८२.६ अरब डॉलर इतक्या संपत्तीचे धनी असून त्याबाबतीत ते जगात सहाव्या क्रमांकावर आहेत. आपल्या बालपणीच्या आयुष्यात चिंगम विकून आर्थिक गुजराण करणारे बफे आता गुंतवणूक गुरू बनले आहेत. वयाच्या सहाव्या वर्षीच ते व्यवसायात आले. चिंगम विकण्याचा तो व्यवसाय होता. आपल्या आजोबांच्या दुकानातील माल घेऊन ते बाहेर नेऊन विकत असत. त्यातून आलेले पैसे मग त्यांनी जमा केले आणि १९४१ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली. त्यांनी व बहिणीने त्यावेळी खिशात असलेल्या १२० डॉलरमधून सिटीज सर्विस कंपनीचे ३ शेअर घेतले. त्यावेळी त्यांची किंमत होती फ़क़्त ३८.२५ डॉलर. मात्र, त्यांनी ४० डॉलर झाल्यावर ते विकून टाकले. मग तोच शेअर पुढे वर्षभरात २०२ डॉलरला पोहोचला आणि बफे शिकले की बाजारात धोरणात्मक गुंतवणूक करायला पाहिजे. थांबण्याची तयारी हवी. त्यासाठी योग्य अभ्यास हवा.

  अपयशातून शिकले आणि यशस्वी झाले

  १९४३ मध्ये त्यांनी पेपर विकून आलेले पैसे बाजारात गुंतवायला सुरुवात केली. त्यातून चांगले पैसे येत असल्याने वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी आयकर भरायला सुरुवात केली. १९४७ मध्ये मित्राच्या मदतीने त्यांनी विल्सन्स कॉइन ऑपरेटेड मशीन कंपनी सुरू केली आणि पदवी झाल्यावर १२०० डॉलरला विकली. त्यावेळी त्यांच्याकडे सगळे मिळून ५००० डॉलर होते आणि वर्ष होते १९४७. वर्ष १९६१ मध्ये ते बफे फंड, Dacee, बफे एसोसिएट्स, मो—बफ, अंडरवुड, Emdee और Glenoff अशा नावाच्या ७ पार्टनरशीप फर्मचे मालक होते. नंतर १९६२ मध्ये त्यांनी सर्व कंपन्या मर्ज करून बफे पार्टनरशिप नावाची संस्था तयार केली. त्याचवेळी त्यांनी टेक्सटाइल मैन्युफैक्चरिंग कंपनी असलेल्या बर्कशायर हैथवे यांचे शेअर घेतले. १९६५ मध्ये त्यांनी वॉल्ट डिज्नी कंपनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक कंपन्या डूबल्या आणि बंदही कराव्या लागल्या होत्या. अपयशातून मात्र ते शिकले. नवीन प्रयोग करीत राहिले आणि यशस्वी झाले.

  ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

  तब्बल ८५ टक्के संपत्ती केली दान

  अशा पद्धतीने बफे यांचा प्रवास सुरू झाला. मग त्यांनी McDonald’s, Gannett, PNC Bank, Helzberg’s Diamond Shops, R.C Willey, Flight Safety International, Kansas Bankers Surety Co, Star Furniture, International Dairy Queen, Travelers, US Airways, General Re, Jordan’s Furniture Company, Ben Bridge  यासह अनेक दिग्गज कंपन्यामध्ये आपली गुंतवणूक वाढवत नेली. २००६ मध्ये ते कोका कोला कंपनीत निदेशक पदावर असतानाच त्यांनी आपली एकूण संपत्तीमधील ८५ टक्के हिस्सा बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांना सामाजिक कार्यासाठी दान दिला. त्यानंतरही उरलेल्या १५ टक्क्यांमधून त्यांनी आणखी संपत्ती कमावली. ती किती आहे आणि अजूनही ते कसे इन्व्हेस्टमेंट गुरू म्हणून कायम आहेत हे आपण जाणताच..!

  कंजूष नसलेले आणि आपल्याच पद्धतीने जगणारे बफे

  दान करायचे म्हणजे आपल्याच घरातील किंवा जास्तीतजास्त कंपनीच्या सामाजिक संस्थेला पैसे देणारे दानवीर आपण खूप पाहतो. जगभरात त्यांची वणवा नाही. मात्र, आपल्या संपत्तीच्या ८५ टक्के दान, आणि तेही त्रयस्थ संस्थेला.. हा पराक्रम फ़क़्त बफे यांच्यासारखे अवलिया करू शकतात. त्यासाठी पैसे गोळा करून जगाला ज्ञान शिकवणारे नाही लागत. निस्वार्थी वृत्तीवालाच त्यासाठी पाहिजे. बफे अजूनही साधे जीवन जगतात. स्मार्टफोनची त्यांना गरज वाटत नाही.. ना अलिशान कारची.. ना मोठ्या घराची.. हा म्हणजे ते काही कंजूष नाहीत.. कारण ८५ टक्के संपत्ती दान करणारा कंजूष कसा असेल..? नाही ना.. बफे आपल्या पद्धतीने शांत जीवन जगणारे संतमहात्मा आहेत. म्हणूनच या अवलियाला ‘टीम कृषीरंग’तर्फे वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा..!

  लेखक : सचिन मोहन चोभे

  ता.क. : गोष्ट आवडली तर आपल्या पाल्य, पालक आणि मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा..

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here