केडिया म्हणतात ‘मार्केटचा बिपी वाढलाय’; वाचा त्यांच्या अनुभवाचे मुद्दे, नाहीतर अपयश निश्चित

मागील काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारात एक नाव आदराने घेतले जाते. सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याप्रमाणेच त्यांचा शब्दही बाजारात प्रमाण मनाला जातो. ते नाव म्हणजे विजय केडिया त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक आणि सध्याच्या अनैसर्गिक वाढीबद्दल आपले मत सांगितले आहे. प्रसिद्ध अर्थपत्र इकॉनॉमिक टाईम्स यांच्या लेखामध्ये त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, सध्या मार्केटचा बिपी वाढला आहे. तो समजून न घेता जर गुंतवणूक करीत राहिलात तर अपयश येऊ शकते.

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून अनेकजण फसतात आणि मग पैसे गमावून बसतात हा महत्वाचा मुद्दा केडिया यांनी सांगितला आहे. स्वत:च्या ३० वर्षांतील अनुभवानुसार त्यांनी म्हटले आहे की, मी बाजारात झटक्यात करोडपती होण्यासाठीच आलो होतो. त्यावेळी सुरुवातीच्या काळात मीही मग अशा पद्धतीने वाढणाऱ्या पण बेभरवशाच्या स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक केली आणि तो प्रयत्न अर्थातच फसला. आताही अनेक असे शेअर आहेत जे मागील ५ महिन्यात १०० ते १६०० टक्के इतके वाढलेले आहे. मात्र, त्यांच्यामध्ये झालेली गुंतवणूक कितपत नफा देईल हे एकतर फसवणूक करणारा किंवा देवच सांगू शकेल. कारण, आता मार्केट किती वाढेल याचा काहीही अंदाज नाही ना किती पडेल याचाही.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

त्यांनी सांगितलेले मुद्दे असे :

 • देशाची अर्थव्यवस्था खूप कमजोर आहे असे नाही. मात्र, सध्या मार्केटमधील वाढ ही नव्याने आलेल्या आणि गुंतवणूक केलेल्या रॉबिनहूड इन्व्हेस्टरमुळेही आहे.
 • शरीरात जशी रक्ताची गरज असते त्याच पद्धतीने बाजारात लिक्विडेशन आवश्यक आहे. मात्र, याचे प्रमाण जास्तही चांगले नाही ना कमी. त्याचे प्रमाण योग्य असावे लागते.
 • रात्रीतून करोडपती होण्याची स्वप्ने पाहून या बाजारात अजिबात गुंतवणूक करू नका.
 • बातम्या किंवा आतील बातम्या आल्याचे समजून त्यावर विसंबून राहून गुंतवणूक करू नका. अभ्यास करून आणि कंपनीच्या सर्वांगीण अभ्यासातून कुठे गुंतवणूक करायची ते ठरवा.
 • बाजारात पैसे कमावणे चांगले आहे. मात्र, त्याच्या नादी लागून कुठेही गुंतवणूक करून वर्षानुवर्षे कमावलेले पैसेही आपण एकाच झटक्यात गमावू शकतो हे लक्षात घ्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here