ब्रेकिंग न्यूज : ‘त्या’ एकाच बातमीने शेअर बाजाराला झटका; बसला ५ लाख कोटींचा फटका

शेअर बाजारामध्ये कोणत्या घटनेने मार्केटला बुस्टर डोस मिळेल आणि कशाने मार्केट एकाच झटक्यात ढूस होईल याचा काहीही नेम नाही. आजही त्याच पद्धतीची परिस्थिती भारतीय शेअर बाजारात दिसली आहे. कुरापतखोर चीनने सीमेवर पुन्हा एकदा घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याची बातमी आली आणि तेजीमध्ये असलेला बाजार दणक्यात कोसळला. होय, इतका की त्याने गुंतवणूकदारांनी आपले किमान ५ लाख कोटी रुपये गमावले आहेत.

मध्यमवर्गातील आणि श्रीमंत गटातील मंडळींचा बाजार म्हून अजूनही शेअर बाजाराची ओळख पक्की आहे. हा वर्ग अगदी छोट्या गोष्टीनेही विचलित होऊ शकतो. आजही त्याचाच प्रत्यय आला. भारतीय सैन्य नेटाने चीन्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर डोळ्यात टेल घालून सज्ज आहे. केंद्र सरकारनेही सगळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वेळोवेळी महटले आहे. त्याचवेळी एक बातमी आली की, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री सीमेवर चीनी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. ही बातमी येण्याच्यापूर्वी बाजारात तेजी होती. गुंतवणूकदार आणखी जास्त पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने वाट पाहत असताच ही बातमी आली आणि अनेकांनी प्रॉफिट बुक करायला सुरुवात करण्यासाठी शेअरची विक्री सुरू केली.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

अशा पद्धतीने बाजाराला किमान ५ लाख कोटी इतका मोठा फटका या एकाच बातमीने बसला आहे. आज सकाळी बाजार वेगाने वाढत होता. ५०० अंकांच्या वाढीसह सेंसेक्स थेट ४० हजाराला शिवला होता. मात्र, ही बातमी आल्याने मग १५०० इतक्या अंकांनी त्यात घट झाली. परिणामी बाजारातील भांडवलाची किंमत (शेअरची किंमत) ५ लाख कोटी रुपये इतके कमी झाली आहे. SBI, सनफार्मा, NTPC, बजाज फिनसर्व, बजाज फसइनेंस, कोटक बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सीमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, ICICI बँक, एल अँड टी आणि मारुति या बड्या शेअरमध्येही यामुळे मोठी घट झाली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here