रिलायन्स बनणार रिटेलिंगचा बादशाह; वाचा काय असणार आहे रिटेल सेक्टरचे ‘फ्युचर’

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मोबाईल सेक्टरसह आता रिटेल सेक्टरमध्येही बादशाह बनण्याचा टप्पा गाठला आहे. फ्युचर ग्रुप यांच्याकडील रिटेल डिव्हिजन ताब्यात आल्यावर ही कंपनी रिटेलिंगमधील बादशाह होणार असेच चित्र आहे.

रिलायन्स म्हणजे जोरदार मार्केटिंग आणि स्पर्धेमध्ये जिंकण्याच्या तंत्राद्वारे भल्याभल्यांना धूळ चरणारी कंपनी असेच चित्र आहे. सर्व बाजूची मदत घेऊन ही कंपनी यश मिळवते. दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्यापासून या कंपनीचा हा इतिहास आहे. आताही मोबाइलमध्ये जिओद्वारे मार्केटचा राजा बनलेल्या रिलायन्सला आता त्या सेक्टरचा बादशाह होण्याची आस लागली आहे. जगभरातील गुंतवणूकदार बरोबर घेऊन ही कंपनी त्यासाठी पुढे झेपावली आहे. आता त्यामध्ये आणखी एका सेक्टरचीही भर पडली आहे. ते म्हणजे रिटेल सेक्टर.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

या सेक्टरमध्ये सध्या सर्वाधिक दुकानांची चेन याच कंपनीकडे आहे त्यांचे ११ हजार ७८४ रिटेल शॉप्स आहेत. आता फ्युचर ग्रुपचे अधिग्रहण पूर्ण झाले की या कंपनीचे देशभरात १३ हजार ५८४ इतके शॉप होतील. म्हणजेच त्याद्वारे आताच्या घडीला होणारी विक्री लक्षात घेतल्यास १ लाख ९२ हजार ९३६ कोटी रुपयांसह ही कंपनी देशाच्या एकूण रिटेल सेक्टरमधील ३० पेक्षा जास्त टक्क्यांचा हिस्सा असलेली कंपनी बनेल. यामध्ये सध्या स्पर्धेत डीमार्ट, टायटन आणि इतरही कंपन्या आहेत. मात्र, रिलायन्सच्या तुलनेत त्यांचा टक्का खूप कमी आहे. त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे छोट्या दुकानदारांना त्यामुळे मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

सध्या देशात रिटेल बिजनेस ४२ लाख कोटी इतका मोठा आहे. त्यामध्ये ५९ टक्के वाटा किराणा आहे. तर, उरलेल्या ४१ टक्क्यांमध्ये कपडे, चप्पल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे युरोमीटर या बाजार अभ्यासक संस्थेचे म्हणणे आहे. रिलायन्सकडे असे आता सुमारे ८०० दुकाने असतील. मात्र, त्याद्वारे त्यांचा बाजारातील वाट किमान २० टक्के इतका मोठा असेल.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here