केंद्रातील सरकार ‘असत्याग्रही’; पहा असे का म्हटलेय राहुल गांधी यांनी

देशाची अर्थव्यवस्था खूप वाईट वळणावर आहे. अशावेळी चुका काबुल करून आणि समन्वयातून मार्ग काढून देशाला पुढे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मात्र, दैववादी भूमिकेतून याकडे पाहायला लावून हात झटकत आहेत. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे.

ट्विटरवर याबाबतची भूमिका मांडणारा खास व्हिडिओ त्यांनी शेरा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मागील ४० वर्षांमध्ये आलेली नसेल इतकी मोठी मंदी सध्या देशात आहे. अशावेळी यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यावर काहीही न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे शिलेदार ही दैवी आपत्ती असल्याचे म्हणत आहे. मुळात ही नोटबंदी आणि नंतरचा चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या जीएसटी प्रक्रियेचा परिणाम आहे. त्या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था संकटात असतानच चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन लागू केला गेला. परिणामी देशातील कोट्यवधी रोजगार गेले आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

अर्थव्यवस्था की बात या शीर्षकाखाली गांधी यांनी सदरचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहण्याचे आवाहनही त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये केले आहे. ३ मिनिटे आणि ३८ सेकंद इतक्या लांबीचा हा व्हिडिओ आहे. देशासमोरील हे खूप मोठे संकट असून त्याचे निवारण करण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकारमधील मंत्री व नेते यांच्याकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्या पोस्टवर ट्रोलर्स मानादालींनी नेहमीच्या थाटात आपला अभ्यास सांगण्यास सुरुवात केली आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here