राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ महत्वाची आठवण; पहा काय म्हटलेय त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबाबत

सध्याच्या एकूण आर्थिक दुरवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देश मागील किमान ४० वर्षांतील सर्वात मोठ्या बेरोजगारीच्या समस्येमध्ये अडकला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत घडलेली एक महत्वाची आठवण सांगितली आहे.

ट्विटरवर ३.३८ मिनिटांचा एक व्हीडीओ गांधींनी शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, एकूण देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी आणि आताची एकाएकी लागू केलेले लॉकडाऊन यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. त्याद्वारे देशातील ४० कोटी गरीब व कष्टकरी जनतेला गुलाम बनवण्याचे हे षड्यंत्र आहे. असंघटीत क्षेत्राला संपवण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे.

असंघटीत क्षेत्राचे महत्व सांगताना त्यांनी एक आठवण सांगितली आहे. ते त्या व्हीडीओमध्ये म्हणतात की, २००८ मध्ये जगभरातील अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या होत्या आणि भारतीय अर्थव्यवस्था सक्षम होती. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. एकदा भेटीत भारताच्या या यशाचे गमक कशात आहे हे त्यांना विचारले. तर, ते म्हणाले होते की, असंघटीत क्षेत्र ही भारताची पहिली महत्वाची अर्थव्यवस्था आहे. त्यात कष्टकरी आणि शेतकरी येतात. त्यांच्यामुळे अजूनही भारत सक्षम आहे. एकूणच देश सक्षम राहण्यासाठी १० टक्के संघटीत क्षेत्रातील जनता नाही, तर असंघटीत क्षेत्रातील ९० टक्के जनता सक्षम राहण्याची खरी गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हेच क्षेत्र मोडीत काढण्याचे धोरण ठेवले आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here