धक्कादायक : म्हणून Paytm कडे खंडणीची मागणी, वाचा काय आहे नेमके प्रकरण

सायबर क्रिमिनल मंडळी काहीही करून पैसे मिळवण्यासाठीचा नवीन घोळ घालताना सध्या दिसतात. असाच प्रकार पेटीम मॉल (Paytm Mall) याबाबत घडल्याचा अंदाज आहे. अनरिस्ट्रिक्टेड एक्सेस घेऊन जॉन विक नावाच्या एका साइबरक्राइम ग्रुपने कंपनीला खंडणी मागितल्याची अमेरिकेतील साइबर रिस्क इंटेलीजेंस प्लेटफॉर्म Cyble  यांनी म्हटले आहे. मात्र, कंपनीने याचे खंडन केले आहे.

एकूणच Cyble  ने डेटा चोरी करून खंडणी वसूल केली जात असल्याचे म्हटले असतानाच पेटीम कंपनीने मात्र असे काहीही झाले नसल्याचा दावा केला आहे. फायनान्शियल एक्स्प्रेस या अर्थपत्राने या महत्वाच्या बातमीचा खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, Cyble नावाच्या संस्थेने कंपनीशी झालेला वार्तालाप आणि इतर मेसेज यांच्या आधाराने हा दावा केला आहे. वास्तविक कंपनीने मात्र त्यास नकार दिल्याने काय खरे आणि काय खोटे हे फ़क़्त कंपनीलाच माहिती आहे. कंपनीने आपला डेटा एकदम सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

जॉन विक नावाचा हा ग्रुप यापूर्वीही साउथ कोरिश आणि HCKINDIA या नावाने काम करीत असल्याचे Cyble  यांनी म्हटले आहे. ते खंडणीची रक्कम क्रिप्टोकरंसीच्या स्वरुपात घेतात. डेटा चोरीसाठी बग लावायला ते कंपनीच्या आतल्याच एखाद्याला तयार करून हा गोंधळ घडवतात. यापूर्वीही पेटीम कंपनीचा डेटा अशाच पद्धतीने चोरीचा प्रकार झालेला असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. तसेच Zee5, SquareYards, Stashfin, Sumo Payroll, Square Capital, i2ifunding, e27 यांनाही या सायबर माफियांच्या ग्रुपने यापूर्वी लक्ष्य केल्याचे फायनान्शियल एक्स्प्रेसचे बातमीदार संदीप सोनी यांनी बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

मूळ बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.financialexpress.com/hindi/business-news/paytm-mall-entire-database-has-suffered-a-massive-data-breach/2069782/

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here