लॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत ‘लोकरंग’वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वास

करोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू झाला आणि अवघ्या जगभरातील मार्केट ट्रेंड बदलला. दर्जेदार सेवा आणि खात्रीशीर व निर्भेळ अन्न यांची मागणी वाढली. त्यावेळीच अहमदनगरमधील लोकरंग कॉर्पोरेशन संचालित एल मेगामार्ट (L Megamart) या स्टार्टअपने नगरकरांना रास्त भावात घरपोहोच किराणा सेवा दिली. त्यातूनच मागील पाच महिन्यात सेवाभाव जपत नगरकरांचा विश्वास प्राप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ‘लोकरंग’च्या संस्थापक-अध्यक्ष माधुरी चोभे यांनी सांगितले की, आमच्या या उपक्रमास मागील आषाढी एकादशीला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीतही आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून नगरमध्ये घरपोहोच किराणा सेवा देत आहोत. आमच्या फ्री होम डिलिव्हरी सेवेचा आतापर्यंत १०७३ नगरकरांनी लाभ घेतला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. आम्ही १५०० रुपये किमतीपेक्षा जास्त रकमेचा किराणा ग्राहकांना थेट घरपोहोच देत होतो. लॉकडाऊन लागू झाल्यावर सुरुवातीला आम्हालाही भीती वाटली. मात्र, ग्राहकांनी दर्जेदार किराणा रास्त भावात मिळत नसल्याबाबत अनेक फोन केले. मग आम्हीही या कालावधीत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व प्रशासनाकडून दिलेल्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करून सेवा दिली.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही व्हाटस्अॅप आणि मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून किराणा यादी आल्यावर घरपोहोच देतो. त्यासाठी ग्राहकांना फ़क़्त 9551915050 या मोबाइल क्रमांकावर मेसेज किंवा कॉल करावा लागतो.  आमच्या गाडीतून मग ही किराणा यादी चार तासांमध्ये फोन करून व वेळ घेऊन पोहोच केली जाते. ही फ्री होम डिलिव्हरी आहे. उलट आम्ही एमआरपीवरही १ ते ६ टक्के सूट देतो. लॉकडाऊन कालावधीत काही दुकानदारांनी शेंगदाणे आणि काही वस्तूंचे भाव खूप वाढवले. शेजारील दुकानात ग्राहकांची पिळवणूक होत असतानाच आमच्या शेकडो ग्राहकांनी मग आमच्या विश्वासार्ह सेवेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली. परिणामी आणखी नवीन ग्राहक आम्हालाही जोडले गेले. आमच्याकडे एकदम रास्त भावामध्ये गोसरीची फ्री होम डिलिव्हरी दिली जाते. आमच्या सेवेवर ग्राहक समाधानी आहेत आणि त्या समाधानी ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हीच खऱ्या अर्थाने आमची मागील वर्षभरातील कमाई आहे.

लॉकडाऊन कालावधीत आमच्या सेवेची व्याप्ती आणखी वाढली. मागील तीन महिन्यात आमच्याकडील ग्राहाकांची संख्या वाढल्याने ३० टक्के इतकी ग्रोथ झाली आहे. पुढील काळात यामध्ये आणखी काही वाढ अपेक्षित आहे. नवीन स्कीम, ग्राहकांचे समाधान, दर्जेदार सेवा आणि माफक भाव ही आमच्या सेवेची ठळक वैशिष्ट्ये असल्याची माहिती माधुरी चोभे यांनी दिली.

संपादन : विनोद सूर्यवंशी

https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Flokrang.ahmednagar%2Fposts%2F3490583314310493&width=500

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here