मुंबई विमानतळ झाले ‘अदानी’मय; GVK चा हिस्सा खरेदी केल्याने वाढली हिस्सेदारी

देशातील सर्व विमानतळावरील हक्क प्रस्थापित करण्याची इच्छा असलेल्या अदानी समूहाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या मुंबई विमानतळामध्ये 74 टक्के हिस्सेदारीची तयारी केली आहे. GVK समूहाची ५०.५ टक्के भागीदारी ताब्यात घेऊन सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे या विमानतळाला ‘अदानी’मी करून टाकणार आहेत.

मागील काही वर्षांमध्ये अदानी समूहाने भारतात आणि परदेशातही वेगाने वृद्धी केली आहे. एकूणच त्यांचा वाढीचा वेग रिलायन्स इंडस्ट्रीजइतका नसला तरीही चांगला आहे. त्यातूनच आता या समूहाने देशभरातील विमानतळ ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. नुकतीच त्यांना तिरुअनंतपुरम विमानतळ ताब्यात घेण्यास मोठा विरोध झाला होता. मात्र, त्यानेही न डगमगता अदानी समूहाने आत मुंबई विमानतळात 74 टक्के इतकी मोठी हिस्सेदारी घेण्याची तयारी केली आहे. फायनान्शियल एक्स्प्रेस यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

अदानी समूहाने म्हटले आहे की, GVK समूहाशी याबाबतीत करार झालेला आहे. त्यानुसार आता अडाणी एयरपोर्ट होल्डिंग्स ही कंपनी त्यांचा हिस्सा खरेदी करणार आहे. त्यांचा हा हिस्सा खरेदी केल्यावर मग या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाचा हक्क ७४ टक्के इतका होईल. यासह एयरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ अफ्रीका (ACSA) आणि बिडवेस्ट  यांच्या २३.५ टक्के हिस्सा खरेदी करण्याचीही बोलणी चालू झालेली आहे. असे जर झाले तर मग मुंबई एयरपोर्ट खऱ्या अर्थाने ‘अदानी’मय होईल.

संपादन : सचिन पाटील

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here