धक्कादायक : जीडीपी थेट रसातळाला; पहा पहिल्या आर्थिक तिमाहीत किती बसलाय झटका

देशाची अर्थव्यवस्था संकटात असल्याचे सर्वांनाच दिसत आहे. केंद्र सरकारने थेट देवाचा हवाला देऊन याची जबाबदारी झटकली आहे. अशावेळी जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीच्या आकड्यांनी देशातील जाणत्यांची झोप उडवली आहे. देशाचा एकूण जीडीपी थेट रसातळाला गेला आहे.

एकेकाळी ८-१० टक्के वाढीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांच्या देशात आता उणे २४ टक्के इतकी नकारात्मक वाढ (याला वाढ तरी कसे म्हणावे हाही प्रश्न आहेच की) नोंदवली गेली आहे. देशाच्या इतिहासात ४० वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे. मागील चाळीस वर्षे अनेकदा भारतीय अर्थव्यवस्थेला हादरे बसले. मात्र, नकारात्मक म्हणजे उणे अर्थात वजावटीचे आकडे नोंदवले गेले नव्हते. ती परिस्थिती आताच्या तिमाहीत नोंदवली गेली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (NSO)  यांनी जरी केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी याच कालावधीत देशाचा ग्रोथ रेट ५.२ टक्के होता. तर, एकूण आर्थिक वर्षाचा विचार केल्यास ४.२ टक्के इतका जीडीपी होता. मात्र, यंदा लॉकडाऊनचा फटका आणि त्यात यापूर्वीच्या नोटबंदी आणि जीएसटी यांच्यामुळे आर्थिक क्षेत्रात निर्नाम झालेल्या पोकळीमुळे अर्थव्यवस्था थेट नकारात्मक टप्प्यावर पोहोचली आहे. अशी जर परिस्थिती असेल तर देशाला या आर्थिक गर्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील ७ टक्क्यांच्या टप्प्यावर आणण्यासाठी खूप मोठे आणि सक्षम धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमला राबवावे लागणार आहे.

शेती, गृहनिर्माण व बांधकाम, उत्पादन, उर्जा, गॅस सप्लाय, खाणकाम, जंगलसंपत्ती व मासेमारी, सेवा, वित्तसंस्था आणि इतर आठ घटकातील बदल लक्षात घेऊन देशाचा जीडीपी ठरवला जातो. यंदा या सर्व क्षेत्रात मोठी हनी झालेली आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here