गरिबांना गुलाम करण्याचे षड्यंत्र; राहुल गांधी यांनी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची आर्थिक धोरणे ही कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी केला आहेच. मात्र, आज त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन मोदी सरकार गरिबांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र करीत असल्याचाही आरोप केला आहे.

त्यांनी ट्विटरवर ‘अर्थव्यवस्था की बात’ असा एक ३.३८ मिनिटे लांबीचा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील गरीब व कष्टकरी यांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. मागील ४० वर्षांतील अर्थव्यवस्थेसाठी ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. २००८ मध्ये जगाला आर्थक झटका बसला होता. त्यावेळी अमेरिका आणि इतर विकसित देशांनाही मोठा झटका बसल्याचे आपण पहिले. मात्र, त्यावेळीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होती. मात्र, आता नोटबंदी आणि जीएसटी यांच्या चुकीच्या निर्णयानंतर चुकीच्या पद्धतीने केलेल्या लॉकडाऊनचाही फटका देशाला बसला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की असंघटीत क्षेत्र मजबूत असणे हे देशाच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. याचीच आठवण काढून त्यांनी मोदींच्या कार्यकाळात काही कंपन्या आणि उद्योजकांना फायदा मिळायच्या हेतूने हे असंघटीत क्षेत्र मोडीत काढले जात आहे. यातून गरीब, कष्टकरी व सामान्य जनतेला मोठा फटका बसेल. असंघटीत क्षेत्रात देशातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त जनता आहे. त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवायची गरज असताना केंद्र सरकार मात्र जाहिराती आणि सोशल मीडियामध्ये ट्रेंड निर्माण करून चालवले जात असल्याचेही राहुल गांधी यांनी व्हीडीओमध्ये म्हटले आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here