धक्कादायक : उसावर कीड-रोग; ३० टक्क्यांपर्यंत नुकसानीची शक्यता; काळजी घेण्याचे आवाहन

ऊस या नगदी पिकावर सध्या करपा रोगासाराखाच एक रोग आढळून येण्यास सुरुअव्त झालेली आहे. जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात हा रोग आढळत आहे. जास्त पावसामुळे जिथे दलदल निम्रान झाली आहे त्याच भागात याचा प्रादुर्भाव आढळला आहे.

याबाबत कृषी विभागाने म्हटले आहे की, करपासदृश्य रोगाचा हा प्रादुर्भाव आहे. पांढऱ्या माशीच्या अंडी, तसेच प्रौढ अवस्थेतील किडीमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. कृषी विभाग आणि विद्यापीठाचे संशोधक याची पाहणी करून पुढील निष्कर्ष काय ते जाहीर करतील. सध्या काही भागात उसाच्या पानाच्या खालच्या बाजूस गोल, पांढरट पिले आणि कोष दिसत आहेत. तिथे यामुळे उसाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ऊसावर हिमिराक्लोरोपीट या औषधाची फवारणी करण्याचे आवाहन केल्याचे झी २४ तास या वाहिनीने बातमीत म्हटले आहे. या रोगाने ग्रस्त उस पिकाला योग्य त्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळत नसल्याने २५ ते ३० टक्के घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने काळजी घेऊन कार्यवाही करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अशा पद्धतीचे लक्षण दिसलेल्या शेतीची पाहणी करून त्याच्या नुकसानीचा अंदाज कृषी विभाग घेत आहे. त्यामुळे आपल्या भागातही असे काही रोग दिसत असल्यास तातडीने कृषी अधिकार्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. किडीद्वारे पानातील रस शोषून घेतला जात असल्याने ऊस उत्पादनात व साखर उताऱ्यात घट येत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे. एकूणच जास्त पावसामुळे निर्माण झालेल्या दलदलीमुळे आता ऊस उत्पादक आता आणखी संकटात सापडले आहेत.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here