‘बिग बाजार’ अंबानींच्या ताब्यात; पहा कितीला झाली ही डील आणि त्याचे काय होणार परिणाम

फ्युचर ग्रुपचा रिटेल बिजनेसमधील बिग ब्रँड म्हणून ओळख असलेला बिग बाजार आणि इतर काही कंपन्या आता सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ताब्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा रिलायन्स ग्रुपकडून करण्यात आली आहे.

रिलायन्सने जिओ सीम आणून कमी किमतीत सेवा देण्याच्या नावाखाली बाजारात एकहाती वर्चस्व निर्माण केले. नंतर आता मात्र हीच कंपनी बाहुबली झाल्यावर कॉलिंग आणि डेटा असे दोन्हींचे रेट वाढवत आहे. मात्र, ग्राहकांना आता पर्याय नसल्याने आहे त्यालाच चांगले म्हणण्याची वेळ आलेली आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये आता रिलायन्सचे एकहाती वर्चस्व आहे. अशीच परिस्थिती भविष्यात कदाचित ग्रोसरी आणि रिटेलमध्ये येऊन शकते. कारण, बिग बाजार आणि इतर कंपन्यांच्या अधिग्रहणानंतर अंबानींची रिलायन्स बाजारातील बिग ब्रँड बनणार आहे. त्यामुळे किराणा दुकानदार आणि इतर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

फ्युचर ग्रुपच्या बैठकीत रिलायन्सला बिग बाजार आणि इतर काही कंपन्या आणि ब्रँड विकण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)  यांच्या रिलायंस रिटेल वेंचर लिमिटेड (RRVL) या सबसिडरी कंपनीने याची अधिकृत घोषणा केली आहे. एकूण २४,७१३ कोटी रुपयांना हा व्यवहार झालेला आहे. फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (एफईएल) यांच्याकडील कंपन्या रिलायंस रिटेल एंड फैशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) या कंपनीत विलीन करण्यासह त्यात आणखी किमान १२०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी रिलायन्सने केली आहे. यासाठी फ़क़्त आता SEBI, CCI, NCLT, शेयरहोल्डर्स, क्रेडिटर्स यांची मान्यता बाकी आहे. एकूण परिस्थिती आणि झालेला सौदा लक्षात घेता ती कोणालाही अमान्य असण्याचा प्रश्नच नाही की..!

संपादन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here