करोना संकटातही शेतीमध्ये पॉजिटिव्ह इफेक्ट; पहा ‘मन की बात’मध्ये काय म्हटलेय मोदींना

शेतकरी म्हणजे खऱ्या अर्थाने लढवय्या व्यावसायिक. अगदी सगळीकडे निगेटिव्ह वातावरण असतानाही लढणारा आणि भिडणारा शेतकरी या करोनाच्या जागतिक आपत्कालीन संकटामध्येही कोलमडून पडलेला नाही. उलट तो जिद्दीने आणि जोमाने त्याच्याशी दोन हात करून मार्ग काढीत असल्याचेच चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलेल्या आकडेवारीनुसार असेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

यंदा मॉन्सूनचा पाउस वेळेवर आणि मुबलक झाल्याने करोनामुळे कोलमडलेले अर्थकारण बाजूला सारून शेतकरी बंधू-भगिनींनी त्याच्याशी दोन हात केले आहेत. परिणामी मागील वर्षीच्या एकूण पेरणीपेक्षा यंदा तब्बल ७ टक्के इतकी जास्त पेरणी झाली आहे. मोदींनी आपल्या कार्यक्रमात याचाच गौरवाने उल्लेख करून शेतकरी कसे लढत आहेत याचे कौतुक केले आहे. मन की बातच्या ६८ कार्यक्रमात तयंनी आज शेती आणि खेळणी उद्योगातील संधी यावर आपले विचार मांडले.

देशातील कृषीसंस्कृती आणि उत्सवाच्या परंपरा यांच्याबाबत त्यांनी आपले विचार सविस्तर मांडले. ते म्हणाले की, यंदा कोविड १९ आजारामुळेही शेतकऱ्यांच्या एकूण व्यवहारावर विशेष परिणाम दिसलेला नाही. एकूण सर्व पिकांचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ १० टक्के, डाळ आणि कडधान्ये ५ टक्के, अन्नधान्य ३ टक्के, तेलबिया १३ टक्के आणि कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्रात ३ टक्के वाढ झालेली आहे. इतके सगळे त्यांनी सांगितले मात्र कर्जाच्या खाईत अडकलेल्या आणि योग्य हमीभाव मिळण्यासह जाहीर झालेला किमान हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मात्र नेहमीच्या स्टाईलने शांत असल्याचे दिसले आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here