केबीसीतला करोडपती सध्या करतोय ‘हे’ महत्वाचे काम; वाचा ५ कोटी कमावलेल्या सुशील कुमार यांची स्टोरी

Source : India Today

होय बाबांनो, त्यांनी ५ कोटी एकखट्ट्या कमावले होते. तेही आपल्या ज्ञानाच्या जोरावर. होय, सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याच स्टेजवर समोर बसून. आता तोच ५ कोटी रुपये कमावलेला माणूस नेमके काय करीत असेल असा प्रश्न हिडिंग वाचून डोस्क्यात आलाय ना..? तर आज आपण त्यांच्यावरच वाचणार आहोत. त्यामुळे आता काळजीपूर्वक वाचा आणि त्यांच्या या सक्सेस स्टोरीमधून बोध घेऊन कामालाही लागा की..!

३१ जुलै २०१२ मध्ये कौन बनेगा करोडपतीच्या स्टेजवर बिहार के गाव का छोरा असलेल्या सुशील कुमार यांनी तब्बल ५ कोटी रुपयांचा चेक घेतला होता. आताही गुगल केल्यावर त्यांचे त्यावेळचे फोटो आणि बातम्या वाचायला मिळतात. अशा पद्धतीने गावाकडे मोठी रक्कम आली की आपण गाडी, बंगला आणि स्टाईल यामध्येच मश्गुल होऊ शकतो. मात्र, हा अभ्यासू आणि व्यावहारिक हुशार असलेला अवलिया आहे. त्यांनी त्यानंतर आपल्या घराची गरिबी हटवली आणि काम करताना आणखी नवा ध्यास घेतला. लॉटरी लागलेली असल्याचा शिक्का पुसण्याचीच ही भन्नाट कृती आहे. होय, त्यांनी आता पर्यावरण संवर्धन ही गोष्ट डोक्यात घेऊन काम सुरू केले आहे.

सोर्स : डाऊन टू अर्थ (चिमण्यांसाठीचे घरटे आणि चाफा रोपटे घेऊन दुचाकीवर जाताना सुशील कुमार)

गावात संगणक चालवणाऱ्या सुशील कुमार यांना ६ हजार रुपये पगार मिळत होता. त्यांनीच सरकारला दीड कोटींचा कर देऊन केबीसीमधून ३.५ कोटी रुपये घरी आणले होते. मग पुढे नोकरी आणि काम करतानाच त्यांनी अडीच वर्षांपूर्वी चिमणी या पक्षाच्या संवर्धनाची आणि झाडे लावा, झाडे जगवा चळवळीत वाहून घेतले. त्यांनी त्याचे फोटोसेशन करून वेळ दवडला नाही. ते आपले काम रोज करीत राहिले. घरगुती आणि व्यावसायिक काम संपले की पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन ते त्यांच्या भागात काम करीत आहेत. आतापर्यंत सुशील कुमार यांनी चाफा या फुलांच्या झाडांचे ८० हजार रोपटे लावले आहेत. तसेच वड आणि पिंपल यांचे ४०० झाडे लावून त्यांना मोठे केले आहे. आणखीही एक काम सुशील कुमार आवडीने करतात. ते म्हणजे चिमण्यांना घरटे बांधून देणे. डाऊन टू अर्थ या मासिकाने आणि इतर अनेक माध्यमांनी त्यांच्या या महत्वाच्या कामाची दखल घेतली आहे.

चिमण्यांची संख्या खूप कमी होत असल्याचा एक अहवाल त्यांनी वाचला आणि मग चिमणीच्या संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आत ते दररोज झाडे लावीत फिरण्यासह अनेकांना त्यांच्या घरात लावायला लाकडी घरटेही देतात. असह पद्धतीने पैसा आला म्हणून उतला नाही, मताला नाही. उलट नवीन वसा घेऊन त्यांनी समाजाला विकासाचा मार्ग दाखवला आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here