मोदींची परीक्षा पे नही सिर्फ खिलोने पे चर्चा; राहुल गांधी यांनी हाणला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक ‘मन की बात’मध्ये  देशापुढील प्रमुख समस्या, आव्हाने आणि नागरिकांच्या महत्वाच्या अडचणी यांना बगल देऊन नवीन विषय आणतात. आताही त्यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला खेळणी बनवणे आणि विक्रीचा व्यवसाय मांडताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि इतर ट्रेंडमध्ये असलेल्या विषयांना बाजूला सारून थेट खिलोना आणला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी मोदींना टोला हाणला आहे.

त्यांनी ट्विटरवर दोन ओळींच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, JEE आणि NEET या परीक्षांची समस्या सध्या आहे. अशावेळी मोदीजी परीक्षा पे चर्चा करतील असे वाटत असतानाच त्यांनी थेट खिलोने पे चर्चा केली आहे. पढे मन की नही स्टुडंट की बात असेही गांधींनी त्या पोस्टमध्ये जोडले आहे. एकूणच पुन्हा एकदा देशाला मोदींनी चघळायला नवा विषय दिला आहे. देशातील समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा भावनिकदृष्ट्या हात घालून नवीन विषयाला वाचा फोडण्याची मोदींची खास स्टाईल आहे. त्यांच्या या स्टाईलला हे साजेसे आहे.

त्यावर अनेकांनी राहुल गांधी यांना पाठींबा दिला आहेच. परंतु, नेहमीच्या स्टाईलने अनेक ट्रोल करणारे जमा होऊन प्रतिसाद देत आहेत. राहुल गांधी म्हणजे सोपे राजकीय लक्ष्य असे समजून त्यांना सोशल मीडियामध्ये ट्रोल केले जाते. आताही त्यांनी जरी विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलण्याची गरज असल्याकडे लक्ष वेधले तरी त्यांना ट्रोलवाल्यांनी यातही सोडलेले नाही. कारण, असे करून मग बोलणार्यांची तोंडे बंद केली जाणार असल्याचे मत खाली काहींनी लिहिले आहे. एकूणच सध्याचा देश फ़क़्त ट्रोल करणारे चालवत असल्याचे दिसते.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here