IMP : या दहा टिप्स वाचा आणि कमवा पैसे; वाचा झुनझुनवाला यांचा भन्नाट फॉर्म्युला

राकेश झुनझुनवाला हे नाव भारतीय उद्योग जगतात खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी ही ओळख आपला अभ्यास आणि त्याद्वारे कमावलेल्या पैशांच्या जोरावर आहे. सध्या अनेकजण नवे गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी Dmat खाते उघडून येत आहेत. अशावेळी या सर्व नव्याने येणाऱ्या रॉबिनहूड इन्व्हेस्टर मंडळींसह आताही बाजारातून पैसे कमावण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मंडळींसाठी आहेत या खास टिप्स.

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार झुनझुनवाला यांनी चालू महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलेल्या टिप्स आहेत या. त्यांनी आपल्या ५००० रुपयांचे फ़क़्त ४० वर्षांमध्ये १६,४०० कोटी रुपये केलेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या या टिप्स खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी यामध्ये २०० टक्के परतावा देणाऱ्या स्क्रिप्ट्स शोधण्याचेच मुद्दे सांगितले आहेत. यातील सर्व टिप्स काळजीपूर्वक वाचून आणि अभ्यास करून वापरण्याची गरज आहे. नाहीतर आपला तोटा निश्चित आहे.

१. त्यांनी भारतीय बाजारावर पूर्णपणे विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे की, जब घर में ही खाना स्वादिष्ट बन रहा हो, तो बाहर जाकर क्यों खाना. एकूणच त्यांनी स्पष्ट केले आहे की, परकीय बाजारात गुंतवणूक करण्याची त्यांची सध्यातरी इच्छा नाही.

२. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणी काहीतरी टिप्स देत आहे म्हणून त्यांच्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. त्या टिप्स ऐकून आपला अभ्यास करा. त्यावर निर्णय घ्या.

  ३. आपली गुंतवणूक क्षमता आणि जोखीम घेण्याची क्षमता यांचा योग्य मेळ बसावा. उगीचच व्याज किंवा उसने घेऊन गुंतवणूक करू नका. आपली जिद्द, साहस, दृष्टीकोन आणि अभ्यास यातूनच योग्य निर्णय घ.

  ४. एखाद्या कंपनीचे शेअर बाजारातील परिस्थितीच्या विपरीत जर वाढत असतील तर त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे टाळावे. उलट अशावेळी पडलेल्या शेअर स्क्रिप्ट शोधा, भविष्याचा अंदाज घ्या आणि मग त्याचा निर्णय घ्या.

  ५. कंपनीची बॅलन्स शीट अभ्यासा. त्यानुसार संबंधित कंपनी आणि एकूण वास्तविक मार्केटची स्थिती यांचा ताळमेळ व भविष्याचा आडाखा बांधून गुंतवणूक करा.

  ६. अनेकजण ट्रॅक्टर कंपन्यांपासून दूर राहतात. त्यात धोके खूप असतात. मात्र, तिथे वाढण्याची क्षमताही तितकीच मोठी होती. त्यात घेतलेल्या १.२५ कोटी शेअरद्वारे झुनझुनवाला यांचे पैसे १० पटीने वाढले आहेत.

  ७. भारतात सध्या एक कुटुंब सरासरी ३-४ टक्के गुंतवणूक शेअर बाजारात करतात. त्याचवेळी अमेरिकेत हा टक्का ३३ वर आहे. भारतात मोठी क्षमता असून त्यांनी गुंतवणूक केल्यास देशाची अर्थव्यवस्था आणखी भक्कम होईल.

  ८. कोणत्याही कंपनीची झुनझुनवाला यांना दिशा माहित असते. मात्र, ती कंपनी किती टक्के परतावा देईल याचे काहीच अंदाज ते बांधत नाहीत. नफा देण्याची खात्री वाटली की ते गुंतवणूक करतात.

  ९. टिप्स मिळाल्या की लगेचच गुंतवणूक करणारे बहुसंख्य गुंतवणूकदार असतात. मात्र, आपले पैसे योग्य ठिकाणी लावण्यासाठी अभ्यासाची जोड द्या. तसेच मुख्य म्हणजे टिप्सवर १०० टक्के अवलंबून राहू नका.

  १०. झुनझुनवाला यांच्या यशाचे सूत्र असे, ट्रेडिंगमध्ये वेग महत्वाचा आहे. तिथे वेळेवर निर्णय नाही घेतला तर तोटा होतो. परंतु, गुंतवणूक करूनही पैसा मिळतो. त्यासाठी वाट पाहून वेळेची संधी साधावी लागते. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे बायको आणि प्रेयसी आहेत. आपण दोन्हींना एकत्र नाही ठेऊ शकत. त्यांना वेगवेगळे ठेवा. एकीला दुसरीची माहिती अजिबात असणार नाही याची काळजी घ्या.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  *(वाचकांच्या आग्रहास्तव आम्ही हा लेख पुन्हा एकदा प्रसिद्ध करीत आहोत)

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here