‘त्या’ टेक्नोलॉजी कंपन्यांवर ED चे छापे; मुंबई-पुण्यातही कारवाई, ४६ कोटी जप्त

चीनी मोबाईल अॅप्लिकेशन कंपन्या आणि सट्टेबाजी याच्याशी निगडीत असलेल्या कंपन्यांवर आता इंफोर्समेंट डायरेक्टरेट (ED) यांनी कारवाई सुरू केली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरूग्राम येथे छापे टाकून या विभागाने ४६ कोटी रुपये आणि इतर महत्वाचे साहित्य जप्त केले आहे.

 HSBC बँकेच्या ४ खात्यांमध्ये जमा असलेले पैसे अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या चार शहरातील तब्बल १५ संशयित ठिकाणी अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. ईडीने ५ लॅपटॉप, १७ हार्ड डिस्क, फोन आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रही जप्त केले आहेत. यावर गुन्हा दाखल झाल्यावर हैदराबाद सायबर पोलिसांनी Dokypay Technology Private Ltd व Linkyun Technology Pvt Ltd या कंपन्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. चीनी नागरिकांनाही अटक करण्यात आलेली आहे.

चीनी कंपन्या भारतात सट्टेबाजीचं मोठं नेटवर्क चालवत असल्याचे समोर आल्याने ही धडक कारवाई सुरू झालेली आहे. बँक खात्यांसह, व्यवहारासाठी Paytm, Cashfree, Razorpay वॉलेट अकाऊंटही यासाठी वापरले जात असल्याचे पोलिसांना आढळले आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांद्वारे असे स्पष्ट झालेले आहे की, Dokypay Technology Pvt Ltd कंपनीने मागील वर्षी १ हजार २६८ कोटी रुपये सट्टेबाजीतून कमावले आहेत. त्यापैकी ३०० कोटी Paytm या अॅप्लिकेशनमधून आले आहेत. तर, तब्बल ६०० कोटी Paytm मधूनच पाठवले गेले आहेत. Linkyun Technology या कंपनीद्वारे त्यातील १२० कोटींचा व्यवहार झाला आहे. भारतातील ऑनलाईन चायनीज डेटिंग ऍप्सद्वारेही पैशांचा व्यवहार होत असल्याचे आढळले आहे. एकूणच याची पाळेमुळे खूप खोल रुजली असून यामध्ये अनेक बड्या माशांचा समावेश असल्याची शंका अधिकाऱ्यांना आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here