पावसाळा आला की सर्दी, खोकला अशा छोट्मोठ्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे चकरा वाढतात. त्यातच डेंग्यू सारख्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही उपाययोजना करा जेणेकरून आपण या आजारांपासून तसेच डासांच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतो.
होय, डासांपासून मुक्ती ही महत्त्वाचीच गरज आहे. प्रतिवर्षी जगभरात मलेरिया किंवा डेंग्यू यामुळे होणारे मृत्यू हा मोठा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवावर बेतणारे आहे. त्यामुळेच घरात आणि परिसरात मच्छर राहणार नाहीत आणि आपण त्यामुळे आजारी पडणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर मृत्यू नाही पण डॉक्टरांकडे पैसे खर्च करण्याची मोठी समस्या येईलच की..!
हे आहेत उपाय :
- घराशेजारच्या किंवा आसपासच्या परिसरात कोणत्याही फटी, तडे, टायर, भंगारचे सामान असेल तर त्याची आधी विल्हेवाट लावा अकारण त्याच्यामध्ये बरेचदा पाणी साचते. या पाण्यात डास अंडी घालतात.
- आपण राहत असलेल्या ठिकाणी दिर्घकाळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- हे डास स्वच्छ पाण्यात होत असल्याने पाणी भरुन ठेवताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- घरातील जागा जास्तीत जास्त कोरडी राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. त्यामुळे पूर्ण कपडे वापरणे आवश्यक आहे.
- डेंग्यूचे डास साधारणपणे पायाच्या खाली जास्त चावतात. त्यामुळे पाय पूर्ण झाकलेले राहतील असे पहावे.
- फ्लॉवर बेड, कुलरमध्ये पाणी वेळच्यावेळी बदला.
- उकळलेले पाणी प्यावे, ताजे आणि घरी तयार केलेले अन्न खावे.
संपादन : विनोद सूर्यवंशी