सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी हे वाचा; केसगळती आणि चेहऱ्याचे वांग यावर ‘हे’ आहे उपाय

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तरुणी व तरुणांसह सर्वांनाच दोन समस्यांचा सामना करावा लागतो. पहिले म्हणजे केसगळती आणि दुसरी म्हणजे चेहऱ्याचे वांग. आज आपण त्यावरील उपाय आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी याची माहिती थोडक्यात पाहणार आहेत.

केस गळण्याची समस्या असल्यास त्यावर पुढील महत्वाच्या गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील. केस गळण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. मुलींसह आजकाल मुलांनाही ही समस्या कमी वयात सतावते आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांचे नित पोषण न झाल्यामुळे या समस्या उद्भवतात. म्हणून धावपळीचे जीवन असले तरी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि केस ही एक अमुल्य देणगी आहे. जिच्या कमी जास्त होण्याचा मानवी सौंदर्यावर परिणाम होत असतो.

हे आहेत केस गळतीवर घरगुती उपाय :

१) केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावून २० मिनिटं मालिश करावी.

२) अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते.

३) मध आणि दही यांचे मिश्रणही कंडिशनर म्हणून वापरु शकता.

४) केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतात.

५) एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावावे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.

६) काळी डाळ रात्री भिजत ठेवावी. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून त्यात अंडं, लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.

  चेहऱ्यावर येणाऱ्या काळ्या डागांवर (वांग) काही घरगुती उपाय आहेत. अनेक स्रियांना तसेच पुरुषांनाही चेहऱ्यावर काळे डाग असतात. त्यांना वांग असेही म्हटले जाते. गोरी त्वचा असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हे डाग सहज दिसून येतात त्यामुळे ते लपवण्यासाठी लॉक अनेक प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या काळात हा प्रकार गर्भवती महिलांना दिसून यायचा. आता मत्र वांग हे कुणाच्याही चेहऱ्यावर दिसून येतात. त्याला आता कुठलेही वयाचे बंधन राहिलेले नाही.

  आज जाणून घेऊया, चेहऱ्यावर येणाऱ्या ‘त्या’ काळ्या डागांवर घरगुती उपाय :

  • चेहऱ्यावरील वांग व काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा व हलक्या हाताने मसाज करा.
  • दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे ते डाग दूर होण्यास मदत होईल.
  • सनस्क्रीन लावूनच उन्हात जावे. ३० ते ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन सकाळी आणि दुपारी न चुकता लावावे.
  • हल्ली बाजारात पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी चेहऱ्यावर लावता येते. या मातीत असणाऱ्या घटकामुळे त्वचेवरील पुटकुळ्यामुळे पडलेले डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते.
  • डागांसाठी टी ट्रेल ऑइल, कोजीक अ‍ॅसिडयुक्त मलमचा वापर केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.

  संपादन : माधुरी सचिन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here