Breaking News : भाजप कार्यकर्त्यांनी ऐकली मन की बात; सध्या कार्यक्रमालाही करून टाकला इव्हेंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते अगदी छोट्यामोठ्या गोष्टीलाही इव्हेंट म्हणून जोरात साजरा करतात. आजही मोदींनी आपल्या ‘मन की बात’ भारतीयांना सांगितली. त्यावेळी जनतेच्या मन की बात ऐकली जात नसल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित करतानाच मोदींच्या भाजप पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तर याचा इव्हेंट साजरा केल्याचे फोटोही शेअरले आहेत.

राजस्थान भाजपच्या अधिकृत खात्यासह अनेक ठिकाणी असे फोटो आज ट्विटर आणि फेसबुकवर दिसात आहेत. राहुल गांधी यांनी आज मोदींनी देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर ते आता नेहमीप्रमाणे ट्रोल केले जात आहेत. त्याचवेळी पंतप्रधान आपल्याच देशातील जनतेला संबोधित करीत असल्याचा जोरदार इव्हेंट भाजप कार्यकर्ते करीत आहेत. काही ठिकाणी घरगुती, तर काहींनी थेट सामाजिक कार्यक्रम घेतल्यागत गर्दी करून हा इव्हेंट साजरा केला आहे.

मास्क काहींनी त्यात काढलेले आहेत, तर काहींनी मोदिजींनी सांगितलेल्या पर्सनल डिस्टंसिंगला हरताळ फासला आहे. अशा पद्धतीने त्यातील देशाच्या हिताचा मुद्दा बाजूला पडून किती लोकांनी ते ऐकले आणि कशा पद्धतीने त्याला साजरे केले हाच मुद्दा पुढे आणला जात आहे. मुळात देशात सध्या आरोग्य, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर ठोस काहीतरी धोरण जाहीर होण्याची आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. मात्र, त्यालाच हरताळ फसला जात आहे. सत्ताधारी भाजप मश्गुल आहे. तर, विरोधी पक्ष आपला सूर गमावून बसल्याने मग निरर्थक गोष्टींना महत्व येऊन देशाचे मूळ प्रश्न बासनात गुंडाळले जात आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here