सुशांत-रिया केसबाबत प्रेस कौन्सिलने म्हटले ‘हे’; पहा काय दिल्या आहेत माध्यमांना सूचना

सध्या देशासमोर सगळ्यात मोठी समस्या बनलेला विषय म्हणजे आत्महत्या केलेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे काय झाले आणि रिया चक्रवर्ती नावाच्या त्यांच्या अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीने नेमके काय केले. याच्या पलीकडे कधीतरी करोना आणि इतर छुटपुट बातम्या म्हणजेच माध्यमांचे विश्व बनले आहे. त्यामुळेच प्रेस कौन्सिल नावाच्या सरकारी यंत्रणेने यामध्ये वास्तववादी बातम्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

द वायर हिंदी या न्यूज पोर्टलवर म्हटले आहे की, सुशांतच्या एकूण केसबाबत न्यायालयाच्या बाहेरच केसाचा निकाल लावणारी यंत्रणा माध्यमांनी उभी केली आहे. हे दुर्दैवी आहे. ऐकलेल्या आणि निराधार गोष्टींना बातमी म्हणून प्रसारित करून सनसनी निर्माण करण्याच्या नादात खऱ्या अर्थाने माध्यमांनी आपली उरलीसुरली विश्वासार्हता आता कामाला लावली आहे. त्याकडेच लक्ष वेधून प्रेस कौन्सिलने व्यवस्थित वार्तांकन आणि प्रसारण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

उठसूट काहीही आणि आजची बातमी उद्या खोटी ठरवणारी माहिती असलेल्या बातम्या सध्या वृत्तवाहिनीच्या पडद्यावर दिसत आहेत. कोणालाही जाब विचारण्याच्या मुजोरी धोरणात सुशांत सिंग याची केस म्हणजे फ़क़्त टीआरपीचा खेळ बनली आहे. वास्तवात यामुळे पोलीस यंत्रणा आणि आता सीबीआयलाही काय तपास करावा हेच समजेनासे झाले की काय असेच चित्र उभे राहिलेले आहे. याच मुद्याकडे लक्ष वेधून पत्रकारिता म्हणजे खेळ नसून त्यात जबाबदारी आहे. त्यामुळे प्रेस कौन्सिलने यात लक्ष घालण्याची मागणी होत होती. अशावेळी या यंत्रणेने माध्यमांचे कान उपटले आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर उगीचच विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन पत्रकारितेचे मूल्य जपत बातमीदारी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here