स्टँप ड्युटी घटल्याने ‘त्या’ दोघांना होणारा मोठा फायदा; पहा महाराष्ट्रातील निर्णयाचा परिणाम

मुंबई :

महाराष्ट्र सरकारने स्टँप ड्युटी घटवल्याने राज्यात काम करणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत राज्यात फ्लॅट घेताना ५ टक्के इतकी स्टँप ड्युटी लागते. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने करोनाचे मंदीसदृश वातावरण लक्षात घेऊन यात मोठी कपात जाहीर केली आहे. त्याचा मोठा फायदा राज्यातील बड्या कंपन्यांना होणार आहे.

आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुद्रांक शुल्क फ़क़्त २ टक्के लागणार आहे. तर, त्यानंतर मार्च २०२१ पर्यंत हेच शुल्क फ़क़्त ३ टक्के लागणार आहे. त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या मंडळींसह बिल्डर लॉबीला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्याचा फील येत असेल. अशावेळी बाजारातील प्रमुख दोन बिल्डर कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होण्याचा अंदाज इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या आर्थिक वृत्तपत्राने व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, याचा सर्वाधिक फायदा कोलते पाटील डेव्हलपर आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांना होण्याचा अंदाज आहे.

सध्या या दोन कंपन्यांसह बहुसंख्य कंपन्या या अॅफोडेर्बल घरांमध्ये काम करीत आहेत. अशा सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या दोन कंपन्यांसह मुंबईत काम करणाऱ्या ओबेरॉय रिअल्टी यांनाही याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे रिअल इस्टेट या महत्वाच्या सेक्टरला काहीअंशी का होईना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या यातल्या कोलते पाटील यांचा शेअर बाजारातील भाव १८३ रुपये, तर गोदरेज प्रॉपर्टीज यांचा भाव ९०१ रुपये आहे. अशा पद्धतीने फायदा झाल्याचे पाहून जर घरांची खरेदी वाढली तर मग या दोन्ही कंपन्यांचे शेअर काही प्रमाणात वाढू शकतात.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here