‘गोल मशीन’ म्हणून होती त्यांची ओळख; वाचा ४०० पेक्षा अधिक गोल कारणाऱ्या मेजरसाहेबांची माहिती

राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजे मेजर ध्यानचंद यांची जयंती. आज या दिनानिमित्त त्याची आठवण अवघा देश काढीत आहे. त्याचवेळी जगभरातील हॉकीपटू मेजर साहेबांना अजूनही न विसरता आज अभिवादन करीत असतील. कारण, ते फ़क़्त एक खेळाडू नव्हते तर विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदान गाजवणारे लढवय्ये होते. त्यांनी आपल्या एकूण कारकिर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले. तर, त्यापैकी आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी ४०० पेक्षा जास्त गोल करण्याची किमया साधली आहे. म्हून त्यांची ओळख ‘गोल मशीन’ म्हणूनही आहे.

१९३६ मध्ये हिटलरच्या जर्मन टीमला त्यांच्या टीमने ८:१ अशा फरकाने हरवत ऑलिम्पिकचे हॉकी खेळाचे गोल्ड मेडल मिळवले होते. भारताच्या हॉकी खेळाच्या सुवर्णयुगाचे ते खऱ्या अर्थाने प्रणेते होते. १९३५ मध्ये भारताने त्यावेळी न्यूझीलंड देशाचा हॉकी दौरा केला होता. त्यांच्याच देशात झालेल्या एकूण ४९ सामन्यात भारतीय टीमने ४८ विजय आणि पावसामुळे एका सामन्यात टाय अशी कामगिरी बजावली होती. त्या एकूण विजयाचे शिल्पकार होते मेजर ध्यानचंद.

१९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाने त्यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले होते. त्यामध्येही ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. आज त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केल जातो. १९३६ नंतर जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले. नंतर तर मुसोलिनी आणि हिटलर या दोन्ही माथेफिरूंच्या संप्रदायाने जगावर दुसरे महायुद्ध लादले. मग ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धाच बंद पडल्या. जर असे झाले नसते तर ध्यानचंद यांनी देशासाठी आणखी बरीच सुवर्णपदके आणली असती. अखेरीस ध्यानचंद यांनी १९४८ मध्ये हॉकी खेळातून निवृत्ती घेतली.

लेखक : विनोद सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here