पगार देण्यामध्ये भारत ७२ व्या स्थानी; स्वित्झर्लंड पहिल्या, तर पाकिस्तानमध्ये आहे ‘अशी’ स्थिती

जगभरातील देशात संघटीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पगारामध्ये कोणता देश कोणत्या स्थानावर आहे याचा अहवाल पिकोडी डॉट कॉम नावाच्यावेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या, तर भारत थेट ७२ व्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे.

जगभरात एकुअन पगार मिळण्याच्या सरासरीवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पाकिस्तान थेट तळाच्या टप्प्यात असलेल्या देशांमध्ये आहे. तर, भारत मधल्या टप्प्यावरील देशांच्या यादीत असल्याचे दिसते. यामध्ये अग्रस्थानी असलेल्या देशांमध्ये स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे. तिथे सरासरी मासिक वेतन ५ हजार ९८९ डॉलर इतका पगार म्हणजे रुपयात पहिले तर ४ लाख ४९ हजार इतका पगार मिळतो. ४,०१४ डॉलर अर्थात ३ लाख ९०० रुपये पगारासह त्याखालोखाल नंबर लागतो तो लक्झेम्बर्ग या देशाचा. तर अमेरिका या देशात सरासरी मासिक वेतन २.६४ लाख रुपये आहे. अमेरिका हा महासत्ता असलेला देश यामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत पुढे डेन्मार्क, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कतार, नॉर्वे, हॉंगकॉंग, आईसलंड या देशांचा नंबर लागतो. आशियामध्ये सर्वाधिक वेतन देणाऱ्या देशामध्ये भारत दहाव्या स्थानावर आहे. आपल्याकडे प्रतिमास ३२ हजार ८०० रुपये अशी सरासरी आहे. दक्षिण कोरियामध्ये १.७३ लाख, चीनमध्ये ७२ हजार, मलेशियात ६२ हजार, थाईलंड देशात ४६.४ हजार असे वेतन दिले जाते. तर आपल्या शेजारच्या पाकिस्तान देशातील मासिक सरासरी वेतन भारतीय रुपयामध्ये १५ हजार ७०० रुपये आहे. या यादीत सर्वात तळाला नंबर लावला आहे तो क्युबा नावाच्या देशाने. तिथे मासिक सरासरी वेतन फ़क़्त २ हजार ७०० रुपये असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

लेखन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here