तर इकॉनॉमीला बुस्ट करू शकते फ़क़्त शेती; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात

नोटबंदी, जीएसटी आणि आता त्यात भर म्हणजे करोना विषाणूमुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने संकटात गेल्याची अनुभूती भारतीय जनता घेत आहे. अशावेळी देवाच्या हवाल्यावर ठेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपली आणि एकूणच केंद्र सरकारची हतबलता सिद्ध केली आहे. मात्र, या वाईट काळातून फ़क़्त शेती हेच क्षेत्र देशाला तारू शकत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

होय, वाचताना डोळ्यावर आणि मनावरही तुमचा विश्वास बसत नाही ना? कारण शेती म्हणजे नाकर्त्या लोकांचे क्षेत्र असेच आता म्हटले जात असल्याचे चित्र आहेच की. सोशल मीडियामध्ये शेती-मातीच्या गप्पा मरणाऱ्या आपल्यासारख्यांनाही याचे कौतुक नक्कीच वाटेल. मात्र, हे खरे आहे. कारण, शेती हे क्षेत्र कितीही दुय्यम वाटत असले तरीही जगण्यासाठी आणि जगावाण्यासाठीची मोठी ताकद शेती क्षेत्रात आहे. आताही लॉकडाऊन झाल्यावर शेती हेच सेक्टर चालू होते. कारण, ती अत्यावश्यक गरज आहे. यालाच अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण असा अहवाल इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च यांनी प्रसिद्ध केला आहे.

त्यात म्हटले आहे की, औद्योगिक उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात सध्या मोठा फटका बसलेला आहे. हे आगळे सुरळीत व्हायला मोठा कालावधी लागू शकतो. अशावेळी भारतात सर्वाधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे ते क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय. त्यामध्ये असणारी संधी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यंदा मॉन्सूनचा पाउस चांगला झालेला आहे. त्यातच एकूण यांत्रिक विक्रीमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीवर या वाईट काळातही विशेष फरक पडलेला नाही. शेतीचा ग्रोथ रेट यंदाही ३.५ टक्के राहू शकतो. एकूणच देशाच्या या वाईट काळातून अर्थव्यवस्था सुधारून भारताला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता फ़क़्त शेती याच सेक्टरमध्ये आहे असे दिसते.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here