त्यासाठी ITC ने बोलावली ४ सप्टेंबरला बैठक; घेतला जाणार महत्वाचा निर्णय

देशातील कन्झुमर सेक्टरमधील आघाडीची कंपनी असलेल्या आयटीसीने ४ सप्टेंबर २०२० रोजी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावली आहे.त्यामध्ये सनराईज फूडस आणि तिच्या सबसिडरी असलेल्या आणखी दोन कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रीयेवर शिक्कामोर्तब होणार आहे.

ITC ने बॉम्बे स्टॉक एक्सेंजला (BSE) याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार फायनान्शियल एक्स्प्रेसने बातमीत म्हटले आहे की, सनराइज फूड्स, हॉबिट्स इंटरनेशनल फूड्स आणि सनराइज शीतग्रह या तिन्ही कंपन्यांना आयटीसीमध्ये अधिग्रहित करण्यासाठी ही बैठक होत आहे. आयटीसी कंपनीने २ हजार १५० कोटी रुपये इतक्या किमतीला ‘सनराइज’चे अधिग्रहण केले आहे. फ़क़्त संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणे बाकी राहिलेले आहे. पुढील आठवड्यात बोलावलेल्या या बैठकीय याच महत्वपूर्ण निर्णयावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल.

सध्या आशीर्वाद या नावाने आयटीसी कंपनी गव्हाचे पीठ आणि मसाला यामध्ये कार्यरत आहे. मात्र, सनराइजच्याही इतर उत्पादनांची आता यामध्ये भर पडणार आहे. सनराइज फुडस ही कंपनीही ७० वर्षे इतकी जुनी आहे. पूर्व भारतात ही कंपनी आपला दबदबा ठेऊन आहे. आता आयटीसी त्यांच्यासह येथे आपले नाव रोषण करणार आहे.

करोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात आयटीसी कंपनीला मोठा फटका बसला आहे. कंपनीला या कालावधीत हॉटेल सेक्टरमध्ये सर्वाधिक झटका बसला आहे. तर, त्याचवेळी शेतीच्या क्षेत्रात मात्र त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवले आहे. एकूण मागील तिमाहीचा विचार करता कंपनीला किमान २६ टक्के इतका रेव्हेन्यू मागील वर्षीच्या तुलनेत कमी मिळाला आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here