‘रिलायन्स’मय न होता ‘हे’ बास्केटवालेही घेऊन येणार IPO; पहा कोणत्या क्षेत्रात काम करतायेत ‘हे’ स्टार्टअप

मंदीतही संधी असते असे म्हटले जाते. त्याचाच फील करोनाच्या लॉकडाऊन काळात काही कंपन्यांनी दिला आहे. त्यामध्ये काही नव्या स्टार्टअपही आहेत. अशीच एक स्टार्टअप असलेल्या मिल्क बास्केट यांनी या कालावधीत मोठी आघाडी घेतली आहे. पुढील आर्थिक वर्षात ते आपला आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीला लागलेही आहेत.

मिल्क बास्केट ही ग्रोसरी सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. सध्या दिल्ली, नोयडा, गुरूग्राम, गाजियाबाद आणि बेंगलोर या शहरांमध्ये त्यांची सेवा सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीत सेवा दिल्याने त्यांच्या ग्राहकांमध्ये आणि एकूण उलाढालीत मोठी वाढ झालेली आहे. अशावेळी ही कंपनी ‘रिलायन्स’मय होणार सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला हे विकण्याची तयारी प्रवर्तकांनी केली असे म्हटले जात होते. मात्र, त्यांनी याचे खंडन केले आहे.

सहसंस्थापक सीईओ अनंत गोयल अर्थपत्र इकॉनॉमिक टाईम्स यांना म्हणाले की, पुढील तिमाहीती आमची कंपनी १००० कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल करू शकते. कारण, लॉकडाऊन कालावधीत आमच्या सेवेला प्रतिसाद वाढला आहे. अशा पद्धतीने जोरदार वाढ झाल्याने आम्ही शेअर बाजारात उतरण्याचे आता नियोजन करू शकतो. अगोदर आमचे हे लक्ष्य २०२३ होते. मात्र, आता आम्ही त्यात बदल केला आहे. आता लवकरच ही संधी आम्हाला मिळणार असे दिसते. सध्या कंपनीचा टर्नओव्हर ७०० कोटी आहे.

२०१५ मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. पहिली काही वर्षे त्यांची वाढ खूप संथ होती. मात्र, एकदा ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यावर मग कंपनीने ग्रीप घेतली आहे. आता तर त्यांच्या वाढीचा वेग भन्नाट आहे. त्यामुळेच या कंपनीने आता शेअर बाजारात जाऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे ठरवले आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here