IAS तुकाराम मुंडे म्हणतात ‘ऑल इज वेल’; वाचा त्यांची संपूर्ण पोस्ट

नागपूरचे महापालिका आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्याचवेळी त्यांची करोनाची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्यामुळे ते सध्या विलगीकरण कक्षात असून त्याबाबत त्यांनी फेसबुक पेजवर सविस्तरपणे पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी ‘ऑल इज वेल’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यांनी लिहिले आहे की, All is Well…! मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.

पुढे त्यांनी याच पोस्टमध्ये सर्व शुभेच्छुक आणि त्यांना मानणाऱ्या नागरिकांचे आभार मानले आहेत. तसेच करोना विषाणूची लागण झालेली आहे मात्र, कोणतेही लक्षण दिसत नसल्याने गावभर फिरणाऱ्यांना आवाहन केले आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी.  ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो. All is Well…!

संपदान : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here