हिटलरचेही ‘ध्यान’ खेचले होते ‘त्या’ मेजर साहेबांनी; वाचा जर्मनीचे नागरिकत्व धुडकावणाऱ्या ध्यानचंद यांची ही गोष्ट

काहीजण आपल्या आयुष्यात असा काही पराक्रम करून जातात की युगानुयुगे ते लक्षात राहतात. नव्हे, काही गोष्टींची ओळख त्यांच्याच नावाने बनते. त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद. आज जो राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. तोही त्यांच्याच जयंतीनिमित्त आहे. होय, त्यांचे कार्य तितक्या उच्च दर्जाचे आणि देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगे आहेच. कारण, त्यांनी ऑलिम्पिक नावाच्या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

हॉकीचे सुवर्णयुग म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येतात. ते म्हणजे मेजर ध्यानचंद. होय, काळ सरला मात्र, त्यानंतर आपल्या देशाला हॉकी खेळात असे सुवर्णयुग आणणे नाही पुन्हा शक्य झालेले. राष्ट्रीय खेळ असूनही आपला देश यात पुन्हा मेजरसाब यांच्या कारकिर्दीत मिळवलेल्या यशाच्या जवळही पोहोचू शकलेला नाही. ध्यानचंद यांनी तत्कालीन हुकुमशाहा आणि जगात क्रुरकर्मा ओळखल्या जाणाऱ्या जर्मनीच्या हिटलरचेही लक्ष वेधून घेण्याजोगी कामगिरी केली होती. त्यावेळी हिटलरची जर्मनी जगात आपला दबदबा निर्माण करीत होती. अशावेळी ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने ध्यानचंद यांना जर्मन नागरिकत्व देतानाच त्यांच्या टीममध्ये खेळण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी नम्र नकार देत आपल्याला भारत प्रिय असल्याचे म्हटले होते.

अलहाबाद येथे दि. २९ ऑगस्ट १९०५ साली राजपुत घराण्यात त्यांचा जन्म झाला. ते काही मुळचे हॉकीपटू नव्हते. मात्र, सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना या खेळाची गोडी लागली. फ़क़्त गोडी नाही तर त्यांनी या खेळाचा ध्यास घेतला. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला अनेक स्पर्धांमध्ये भरीव यश मिळाले. नंतर मग ते भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद बनले. १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. १९३६ मध्ये जर्मनीतील ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या टीमने अंतिम सामन्यात ८:१ अशी धूळ चारून देशाला सुवर्णपदक मुलावून दिले होते. त्याच कौतुकासाठी भेटल्यावर हिटलरने त्यांना नागरिकत्वाचा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी पुन्हा आपल्याच देशात येऊन काम केले. आज त्यांची जयंती असल्याने या भारतवीरास टीम कृषीरंगकडून विनम्र अभिवादन..!

लेखक : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here