‘त्या’ ५६ इंची म्युच्युअल फंडाची कमाल; एक लाखाचे झाले ५६ लाख, वाचा आणि इन्व्हेस्टचा विचार करा

शेअर बाजारातील झंझट आणि तिथल्या वरखाली होणाऱ्या आकड्यांच्या घोळत न अडकता त्यापासून दूर राहणारेच जास्त. मात्र, अशा व्यस्त आणि त्रस्त मंडळींसाठीचा बेस्ट पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. होय, त्यातही चांगला परतावा भेटतो. वर्षाला मिळणारा बोनस आणि वाढणारी किंमत यातून आपणही इथे लाखाचे ५६ लाख करू शकता. आज आपण अशाच एका म्युच्युअल फंडाची माहिती पाहणार आहोत. तो आहे एचडीएफसी कंपनीचा.

HDFC TOP 100 असे या फंडाचे नाव आहे. या फंडाने आतापर्यंत २४ वर्षांमध्ये फ़क़्त १ लाख रुपयांचे ५६ लाख करून दाखवले आहेत. शेअर बाजारातील महत्वाच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा हा फंड आहे. याच्या फंड व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने चांदी केली आहे. कारण, एकूण २४ वर्षामध्ये या फंडाने सरासरी थेट १८.३४ % इतके रिटर्न दिले आहेत. म्हणजेच जेंव्हा १ ऑक्टोबर १९९६ मध्ये हा फंड सुरू झाला. तेंव्हा ज्याने कोणी यात एक लाखांची गुंतवणूक केली असेल त्यांचे आता ५६ लाख रुपये झालेले आहेत. अशा पद्धतीने एक मस्त ग्रोथ देणारा फंड म्हणून हा लोकप्रिय झाला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

यामध्ये गुंतवणूक करण्याची अजूनही संधी आहे. कारण, यामध्ये कोणीही कधीही ५००० रुपये देऊन इन होऊ शकतो. तसेच प्रतिमाह ५०० रुपये यासह यात SIP पद्धतीनेही आपण गुंतवणूक करू शकता. सध्या या फंडाच्या ग्रोथवर परिणाम झाला आहे. करोनामुळे त्यातून काहीअंशी कमी रिटर्न मिळत आहेत. मात्र, भविष्यात कदाचित पुन्हा हा फंड चांगली पकड घेऊन शकतो असे फायनान्शियल एक्प्रेसमध्ये म्हटलेले आहे.

या फंडाचे महत्वाचे मुद्दे असे :

२० वर्षांमध्ये १ लाखाचे झाले २८.२९ लाख

२० वर्षांमध्ये २० हजार SIP केल्यावर किंमत १.७४ कोटी

मागील १५ वर्षांमध्ये १ लाखाचे झाले ७.२४ लाख

१५ वर्षांमध्ये १० हजार SIP करणाऱ्यांना मिळाले ४२.३० लाख

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here