EMI वाल्यांसाठी महत्वाची बातमी; वाचा ३१ ऑगस्टला काय होणार आहेत नियमात बदल

भारतीय मध्यमवर्गातील मंडळींचा खरेदीसाठीचा उत्तम पर्याय म्हणजे इएमआय (EMI) आहे. अगदी मोबाइल आणि टीव्हीपासून फ्रीज आणि दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन निवांत कर्जाची परतफेड करण्याचे भारतीयांना आवडते. मात्र, आता लॉकडाऊनमुळे मागील काही महिने हा इएमआय न भरण्याची सूट देण्यात आलेली होती. मात्र, त्यात आता बदल होत आहे.

होय, इएमआय देणाऱ्या मंडळींसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, आता पुढील काळात आपल्याला आपल्या कर्जाचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. त्यासाठी दिली गेलेली इएमआय मोरेटोरिअम आता बंद होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातील मासिक हफ्ता आणि त्यांचे व्याज हे कर्जदारांना देणे बंधनकारक होणार आहे. मागील कालावधीत अशा पद्धतीने नियमितपणे कर्जाचा हफ्ता न देताही ग्राहकांचे सिबिल स्कोअर बाधित होणार नाही याची काळजी घेतली गेली होती. मात्र, त्या कालावधीतील व्याजही कर्जदारांना द्यावे लागणार आहे. नव्हे त्यासाठीचे चक्रवाढ व्याज काही बँकांनी घेण्याचे नियोजन केले आहे.

केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करून ग्राहकांना काहीतरी सूट देईल असे चित्र सध्यातरी आहे. मात्र, त्यावरील घोषणा किंवा अभ्यास कमिटी काही अजूनही बसलेली नाही. मात्र, आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि काही गोष्टी सुरळीत होत असल्याने कर्जाचे नियमित हफ्ते भरण्याची तजवीज कर्जदार ग्राहकांना करावी लागणार आहे. मागील कालावधीत ज्यांनी आपला इएमआय दिला नाही त्यांना थकीत म्हणून समजले जाणार नाही. मात्र, पुढील कालावधीत जर वेळेवर इएमआय हफ्ता नाही गेला तर त्या कर्जदारास डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाणार आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here