मुंबई :
कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पाच वर्षांचा पूर्ण कालावधी न देण्याची कॉंग्रेस पक्षाची जुनी खोड असल्याकडे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लक्ष वेधले आहे. एकूणच भाजप हा एकमेव पक्ष आहे जो नेत्याला पूर्ण मोकळीक आणि पूर्ण कालावधीत देत असल्याकडे वाढ यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत , गेल्या ६० वर्षात एक वसंतराव नाईक सोडले तर देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री आपली ५ वर्षांची टर्म पुर्ण करु शकला नाही. कॉंग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना कधीच स्थिर होऊ दिलं नाही. भाजपा नेहमी स्थिर सरकार व नेता देते”
त्यावर भाऊसाहेब अजबे यांनी म्हटले आहे की, सर्वात कमी कालावधी म्हणजे 80 तासांसाठी मुख्यमंत्री राहीलेले देवेंद्र फडणवीसच आहे. तर, अनघा आचार्य यांनी लिहिले आहे की, “हा अन्याय आहे अध्यक्ष महोदय, हा रेकॉर्ड तर आदरणीय उद्धवसाहेब 2024 साली पार मोडीत काढणार आहेत. पण माझे 2 अभूतपुर्व रेकॉर्ड्स कोणीही मोडु शकणार नाही, त्यांचा उल्लेख देखील नाही. एकाच महिन्यात दोनदा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा..! फक्त 3 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा..!”
पराग मोहिते यांनी प्रतिसाद देताना म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत , गेल्या ६० वर्षात एक देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री निव्वळ ८० तास मुख्यमंत्री असण्याचा रेकॉर्ड करू शकलेला नाही. इतर पक्षाना हे कधीच जमणार नाही. भाजपा नेहमी असले तोंडावर पडण्याचे रेकॉर्ड करते. तर शीलेश पाटील यांनी मागील सत्तेच्या काळातील आठवणी काढून लिहिले आहे की, महाराष्ट्र अधोगतीला मा. तडफडविस साहेबांच्या काळात गेला हे संगायचे राहुल गेले. तरुणांच्या नोकऱ्या गुजरात ला नेल्या. IFSC गुजरात ला नेले. मी प्रभु रामचंद्राला विनंती करतो की पुन्हा फडणवीस किंवा BJP चा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला नको.
लेखक : सचिन पाटील