कुंभकर्णी सरकारने महाराष्ट्राच्या हरीला जाणीवपूर्वक बंदिस्त केले; ‘त्या’ भाजप नेत्यांचा आघाडीवर हल्लाबोल

अहमदनगर :

करोनामुळे लॉकडाऊन लागू करताना बंद केलेली मंदिरे उघडण्यास अजूनही महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिलेली नाही. त्याच्याच विरोधात आंदोलन करताना भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर धर्मवादाचा आरोप केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आमदार बबनराव पाचपुते यांनी महाराष्ट्राच्या हरीला जाणीवपूर्वक बंदिस्त केले असल्याचा आरोप केला आहे. शनिमंदिर (श्रीगोंदा) येथील धार्मिक स्थळाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘दार उघड.. उद्धवा, दार उघड..! राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती, पण धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का दिली जात नाही, हा प्रश्न आज राज्यातील भाविकांच्या मनात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा, पुनश्च हरी ओमच्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

त्यांनी त्याच्याही पुढे लिहिले आहे की, महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरु झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तातून होत आहे. मात्र ‘पुनश्च हरी ओम’ म्हणून हरीलाच बंदिस्त करून सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे.

या आंदोलनात भाजपचे जिल्हा चिटणीस सुनील थोरात, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, महिला अध्यक्षा सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण, राजेंद्र उकांडे, संतोष रायकर, शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, माजी सभापती शहाजी हिरवे, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, सुनील वाळके, अंबादास औटी, महावीर पटवा, दिपक हिरनावळे, मंदाकिनी शेलार, नितीन नलगे, दत्तात्रय जगताप संतोष धोत्रे मेजर, बापूराव जाधव, विजय वाकडे, अमोल अनभुले, विशाल राऊत, नमन भंडारी, कुंडलिक गाडे, भगवानराव वाळके, चंद्रकांत खेतमाळीस, महेश क्षीरसागर, उमेश बोरुडे, संतोष क्षीरसागर, रोहित गायकवाड, नवनाथ हिरवे, राजेंद्र मोटे, मुक्तार शेख, विनोद धामणे, विनोद होले आदि उपस्थिती होते.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here