Good News : अटर्ली..बटर्ली..वाल्या ‘अमूल’ने मिळवले ‘हे’ यश; पहा अस्सल कॉऑपरेटिव्ह इंडियन ब्रँडने काय केलीय कमाल ते

अमूल (Amul) म्हटले की आठवते ती त्यांची ‘अटर्ली..बटर्ली..डेलीशिअस’वाली अमूल गर्ल आणि एकदम चवदार आणि दर्जेदार भन्नाट प्रोडक्ट. होय, आपल्या सर्वांच्या जिभेचा ताबा घेतलेल्या या कॉऑपरेटिव्ह सेक्टरमधील इंडियन ब्रँडने आता जगभरात आपली ओळख आणखी पक्की केली आहे.

सहकारी क्षेत्रात असूनही खासगी कंपन्यांना जे यश मिळाले नाही, ते या कंपनीने मिळवले आहे. दिवंगत डॉ. वर्गीस कुरियन यांनी लावलेले हे रोपटे आता अवघ्या जगभारत विस्तारले आहे. सभासद आणि संचालक मंडळातील समन्वय आणि व्यवस्थापकीय कौशल्याच्या जीवावर या कंपनीने थेट जगभरातील २० प्रमुख दुग्धजन्य पदार्थांच्या कंपन्यांच्या यादीत स्थान पटकावले आहे. अमूल गुजरात कोआपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) यांची ही नाममुद्रा आता डच फाइनेंशियल सर्विसेज कंपनी असलेल्या Rabobank यांच्या यादीत जाऊन बसली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

प्रमुख २० कंपन्यांच्या यादीत भारतीय अमुलने सोळावे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या महत्वाच्या यादीत कोणताही भारतीय दुध ब्रँड पोहोचू शकलेला नाही. त्यात अमूलने यश मिळवल्याने अनेकांना सुखद धक्का बसला आहे.

जगभरातील प्रमुख दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या कंपन्यांची याशी अशी :

 1. नेसले (स्वित्झर्लंड)
 2. Lactalis  (फ्रांस)
 3. डेयरी फार्मर्स ऑफ अमेरिका (यूएसए)
 4. Danone (फ्रांस)
 5. Yili (चीन)
 6. Fonterra (न्यूझीलंड)
 7. फ्राइसलैंड कैंपिना (नेदरलँड)
 8. Mengnju  (चीन)
 9. Arla Foods (स्वीडन/डेन्मार्क)
 10. Saputo (कॅनडा)
 11. DMK (जर्मनी)
 12. Unilever (नेदरलँड / ब्रिटन)
 13. Meiji  (जपान)
 14. Sodiaal  (फ्रांस)
 15. Savencia   (फ्रांस)
 16. GCMMF / अमूल (भारत)
 17. Agropur (कॅनडा)
 18. Kraft Heinz  (यूएसए / अमेरिका)
 19. Schreiber  (यूएसए / अमेरिका)
 20. Muller  (जर्मनी)

संपादन : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here