मुंबई :
इनसायडर ट्रेडिंगप्रकरणी सेक्युरिटी अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांनी फेडरल बँक या खासगी बँकेतील कर्मचाऱ्यांवर दंडाची कारवाई केली आहे. सेबीने म्हटले आहे की, संबंधितांनी शेअर खरेदी-विक्रीमध्ये हस्तक्षेप केला आहे.
बँकेचे कॉर्पोरेट बँकिंग विभागाचे प्रमुख अधिकारी असलेल्या हर्ष दुगड यांनी मार्च-एप्रिल २०१७ या कालावधीत असे केल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सेबीने ८ लाख रुपायांचा दंड ठोठावला आहे. दुगड यांनी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर खरेदी-विक्रीचे हे प्रकरण आहे. नियामनुसार बँकेच्या अधिकाऱ्याने असे करणे चुकीचे आहे.
विशेष म्हणजे दुगड यांनी बँकेच्या व्यवस्थापनालाही याची माहिती दिलेली नसल्याचे चौकशीत आढळले आहे. यासह सेबीने निक्की ग्लोबल फाइनेंस ,लेविया ट्रेडिंग और स्कोप व्यापार या कंपन्यांवरही वेगळ्या प्रकारणार अनुक्रमे ५ लाख, ४ लाख आणि ६ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे. सुप्रसिद्ध अर्थपत्र इकॉनॉमिक टाईम्स यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
संपादन : सचिन पाटील