युरियाबाबत आली महत्वाची बातमी; त्यामुळे खताच्या मार्केटवर होणार ‘हा’ परिणाम

दिल्ली :

तेलंगाना येथील रामागुंडम येथील खताचा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणारा आहे. त्यासाठीचे नियोजन रामागुंडम फर्टिलाइजर्स एंड केमिकल्स लिमिटेड (आरएफसीएल) कंपनीने केले आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत बोलताना अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

इंजीनियर्स इंडिया लिमिटेड, नेशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड आणि फर्टिलाइजर्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया यांचा संयुक्त प्रकल्प म्हणून ही कंपनी सुरू झालेली आहे. ज्यामध्ये १२.७ लाख टन इतके युरियाचे उत्पादन होणार आहे. दि. १५ ऑगस्ट २०२० पर्यंत या संयान्त्रातील लागणाऱ्या सुमारे ९९ टक्के यंत्रसामुग्री बसविण्यात आलेली आहे. एकूणच देशात युरियाची मागणी मोठी आहे. यंदाच्या खरीपात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला होता. मात्र, शेतकऱ्यांना युरिया आणि इतर सर्व खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

अधिकाऱ्यांनी बैठकीत महोती दिली की, ऑक्टोबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यात याचे संपूर्ण काम पूर्ण होईल. कदाचित २० नोव्हेंबरपासून याचे काम सुरळीतपणे सुरू होईल असा अंदाज आहे. सरकारच्या या कंपन्यांनी मिळून ६ हजार १७५ कोटी रुपये खर्च करून हा महत्वाचा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. तेलंगाना सरकार आणि गेल कंपनी यांचेही त्यांच्याकडे शेअर आहेत.

संपादन : विनोद सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here