अखेर रिलायन्स रिटेलचे ‘फ्युचर’ ठरणार; शनिवारी होऊ शकते प्रक्रिया, वाचा ‘बाजारा’तील BIG बातमी

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची घोडदौड कायम आहे. करोना काळात आणि एकूणच अर्थव्यवस्था लक्षात घेता अवघ्या भारतात अनेक कंपन्या आणि व्यवसाय डबघाईला येत असतानाच सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी फॉर्ममध्ये आहेत. आत त्यांनीच आता बिग बाजार नावाची सुप्रसिद्ध नाममुद्रा (brand) असलेल्या फ्युचर ग्रुपच्या रिटेल व्यावसायावर ताबेदारी करायची तयारी केली आहे.

फ्युचर एंटरप्राइजेसच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी होत आहे. त्यातच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची ब्रेकिंग न्यूज इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, हा व्यवहार किमान २९ हजार कोटी रुपयांचा असू शकतो. सध्या फ्युचर ग्रुपवर १३ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे. हे कर्ज बँक व वित्तसंस्था यांचे आहे. तर, इतर देणी आणि थकलेले भाडे लक्षात घेता आता त्यांना किमान ७ हजार कोटी रुपये लागणार आहेत. एकूण व्यवहारातून ते सर्व भागवले जातील. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील हा व्यवहार पूर्णपणे कॅश पद्धतीने होणार आहे.

१९८७ मध्ये सुरु झालेल्या फ्युचर ग्रुपने रिटेल बाजारातील बिग बोस म्हणून आपली ओळख पक्की केली होती. मात्र, नंतर काही कारणाने या कंपनीची किंमत हळूहळू काही होत आल्याने सध्या ती अडचणीत आहे. एकूण बाजारातील सध्याची किंमत आणि कर्ज यामध्ये मोठी तफावत असल्याने रिलायन्सला आता रिटेल व्यवसाय विकण्याची वेळ या ग्रुपवर आलेली आहे. जर उद्या हा व्यवहार झालच तर रिलायन्स रिटेल ही कंपनी १८ हजार शॉप्ससह बाजारातील एक दिग्गज कंपनी म्हणून पुढे येईल. मात्र, उद्या यावर फ्युचर गुर्पाचे संचालक मंडळ काय निर्णय घेणार त्यावरच याचे भवितव्य ठरणार आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here