‘अशी’ आहे इकॉनॉमीची परिस्थिती; पहा काय म्हणतायेत ब्लूमबर्ग आणि रॉयटर्सवाले

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ताईंनी देशाची एकूण आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे हेच अधोरेखित केले आहे. सगळे काही चांगले नव्हे, सर्वोत्तम चालल्याचा दावा एकीकडे केंद्र सरकारचे प्रतिनिधी करीत असतानाच ताईंनी मात्र, सगळे काही देवाच्या हवाल्यावर असल्याचे सांगून आपली परिस्थिती एकदमच बिकट असल्याचे अधोरेखित केले आहे. त्याचवेळी जगातील आर्थिक वृत्तांकन करणाऱ्या संस्थांनीही देशाची परिस्थिती वाईट असल्याचे म्हटले आहे.

देशाची अर्थव्यवस्था कशी आहे हे तपासण्यासाठीचे निकष एकूण आठ असतात. त्यापैकी पाच निर्देशकानी काहीअंशी सुधारणा नोंदवण्यास सुरुवात केल्याचे ब्लूमबर्ग संस्थेने म्हटले आहे. तर, देशातील सध्याची परिस्थिती निवळण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार असल्याचे रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यांनी देशात एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार देशात विक्री आणि उत्पादन क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. हे सर्कल बऱ्यापैकी ब्रेक झालेले आहे. मग त्यातून लवकर कसा मार्ग निघणार हा प्रश्न आहेच की?

देशातील पहिल्या तिमाहीपेक्षा आताच्या तिमाहीत परिस्थिती काहीशी सुधारत आहे. मात्र, एकूण सर्वांगाने विचार केल्यास ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी २०२१ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीची वाट पाहावे लागणार आहे. सध्या देशात सगळे बेस्ट चालले असल्याने इलेक्ट्रोनिक माध्यम आणि न्यूज पेपर यामधून नो निगेटिव्ह न्यूज हा फॉर्म्युला राबवला जात आहे. देशातील प्रमुख समस्या सोडून आत्महत्या केल्यानंतर सुप्रसिद्ध झालेल्या अभिनेता सुशांत सिंग आणि इतर निरर्थक मुद्दे जोरात चालवले जात आहेत. अशावेळी महापूर, बेरोजगारी आणि वाढती गरिबी याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. हे दाखवायला मग थेट बाहेरील देशाच्या आणि नामांकित माध्यम संस्थांना सर्वेक्षण कारावे लागत आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here