‘पॅरेंट्स फर्स्ट’मध्ये कार करा FREE सॅनिटाइज..!

मुंबई :

एमजी मोटर इंडिया कंपनीने एक देशव्यापी उपक्रम सुरू केला आहे. ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ असे या मोहिमेचे नाव असून यामध्ये पालकांच्या मालकीच्या कार सॅनिटाइज करून दिल्या जात आहेत. त्याही चक्क फ्री म्हणजेच मोफत..! करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराच्या साथीमुळे ही मोहीम राबवली जात आहे.

होय, ही काही फेक न्यूज नाही. कंपनीने प्रेसनोट पाठवून त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत देशभरात १ हजार ५०० पेक्षाही जास्त कार या मोहिमेत सॅनिटाइझ केल्या आहेत. यासाठी कोणतीही अट नाही. पालकांची कार कोणत्याही ब्रँडची असली तरीही तिला ही सेवा दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यांना सेफ आणि सॅनिटाइझ्ड ड्रायव्हिंगचा अनुभव देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.  कंपनीच्या देशातील सर्व डीलरकडून हा उपक्रम राबवला जात आहे.

यामध्ये कारचे केबिन संसर्गमुक्त करण्यासाठी इको-फ्रेंडली ‘ड्राय वॉश’ केला आजतो तसेच सीटसारखे टच पॉइंट एरियादेखील स्वच्छ केले जातात. जुलै महिन्यात सुरू झालेली ही मोहीम ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here