धक्कादायक : ‘ही’ कंपनी करणार २५,००० कर्मचाऱ्यांची सुट्टी; करोनामुळे ओढवले संकट

जगभरात अजूनही करोना नावाचे संकट कायम आहे. लस किंवा औषध मिळत नसल्याने मग आता तर हे संकट आणखी गडद होत आहे. भारतात आतापर्यंत या लॉकडाऊन कालावधीत सुमारे १२ कोटी लोकांचे रोजगार गेल्याची शक्यता आहे. त्याचवेळी माहित-तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातली एक प्रमुख कंपनी असलेल्या ‘एक्सेंजर’नेही सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची तयारी केली आहे.

आयटी सेक्टरमधील या कंपनीतर्फे जगभरात बिजनेस केला जातो. मात्र, करोना कालावधीत त्यांनाही याचा फटका बसला आहे. मग अशावेळी एकूण ५ लाख कर्मचाऱ्यांपैकी २५ हजार कामगारांना काढून टाकण्याचीच तयारी या कंपनीने केली आहे. सध्याची काळात कॉस्ट कटिंग करूनच ही कंपनी टिकू शकत असल्याचे लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

भारतात या कंपनीचा सर्वाधिक म्हणजे २ लाख कामगारांचा स्टाफ आहे. त्यामुळे या एकूण २५ हजारांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचाही नंबर लागण्याची भीती आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या बैठकीत अशी चर्चा झालेली असून किमान ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर यामुळे गंडांतर येण्याची शक्यता असल्याची बातमी इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने प्रसिद्ध केली आहे.

 संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here