म्हणून खाद्यतेलाच्या नियमात होणार ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल; पहा त्याचे काय होणार आहेत फायदे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळे बाहेरचे खात होतो. अशावेळी काहीबाही खाऊन तब्बेत खराब करण्याचे फंडे आपण सगळेजण वापरत होतो. आता पर्याय नाही. आहे त्याने पोट भरून जागुयात असाच विचार करून स्पर्धेच्या जगात आपण जोरात पळत होतो. त्याच काळात करोना नावाचा विषाणू आला आणि सगळे काही बदलले. हेल्थ आणि इम्युनिटी पॉवर हे परवलीचे शब्द बनले. कारण, करोना विषाणूमुळे जर कोविड १९ नावाचा आजार झालाच तर मग अशावेळी ठोस औषध व लस नसल्याने आपण फ़क़्त एकाच गोष्टीच्या जीवावर जगू शकतो हा विश्वास सगळ्यांना वाटत आहे. तो म्हणजे सकस आहाराद्वारे मिळालेली इम्युनिटी पॉवर.

त्यामुळेच इम्युनिटीला खराब करणारे घटक आता नागरिकांच्या जीवनातून कमी करण्यासाठी सरकारी पातळीवरून काही गोष्टीही करण्याचे प्रथमच सरकारला सुचले आहे. त्यानुसार आहे खाद्यतेलाच्या बाबतीत एक खास निर्णय घेण्याची तयारी केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी दाखवली आहे. हा निर्णय आहे ट्रान्स फॅट याबाबतचा. सध्या एकुअन तेलाच्या पदार्थात किमान ५ टक्के ट्रान्स फॅट असल्यास चालतात. मात्र, नव्या नियमानुसार हेच प्रमाण २ टक्के आणण्याची तयारी या विभागाने केली आहे. सीईओ अरुण सिंघल यांनी याबाबतीत म्हटले आहे की, प्रत्येकाला चांगले व सकस अन्न मिळणे ही आपल्या देशाची गरज आहे. अशावेळी शरीराला विशेष उपयोगी नसलेल्या व चरबी हा घटक वाढवून पुढे हृदय रोग आणि स्ट्रोक यासारखे आजार जडण्यासाठी निमित्त ठरणाऱ्या ट्रान्स फॅट याचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय झालेला आहे.

  सध्याच्या ५ टक्के प्रमाणापेक्षा २०२१ मध्ये हे प्रमाण ३ टक्के आणि २०२२ मध्ये थेट २ टक्के करण्याचे नियोजन आहे. अशा पद्धतीने लोकांना चांगले खाद्यतेल मिळेल. ज्याद्वारे त्यांना पोषक घटक तर मिळतीलच, त्याबरोबर सर्वांना शरीरावर दुष्परिणाम करणारे अनावश्यक घटकही खावे लागणार नाहीत. तेलाची कीपिंग क्वालिटी (साठवण्याचा कालावधी) वाढवण्यासाठी त्याला हाइड्रोजनीकरण केल्यावर त्यात ट्रान्स फॅट विकसित होतात. तसेक मग पुढे तेच टेल जर तळले तर त्यात या ट्रान्स फॅट आणखी वाढलेल्या दिसतात. हेच प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण, ट्रान्स फॅट हा घटक जितका कमी किंवा अजिबात खाल्ला जाणार नाही तितके चांगले आहे. अशावेळी प्रक्रिया उद्योजकांनाच योग्य दिशानिर्देश देऊन याचे प्रमाण कमी ठेवले तर ग्राहकांना अशा ट्रान्स फॅट कमी खायला मिळतील. त्यामुळे देशातील जनता आणखी सदृढ होण्यास मदत होईल.

  वनस्पती तेल, नकली मख्खन, बेकरी पदार्थ आणि वनस्पती तूप यामध्ये ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणावर आढळतात. अशावेळी मग असे पदार्थ नियमितपणे सेवन करणाऱ्यांना हृदय आणि इतर आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळेच एफएसएसएआय (fssai) यानी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. करोना आजारामध्ये सर्वाधिक मृत्युदर हा हृदयरोगी आणि मधुमेही रुग्णांचा होता. त्यामुळेच सराकर आणि एकूण समाज आता चांगल्या दर्जाचे खाद्य या महत्वाच्या विषयावर आलेले आहेत.

  एकूणच जगभरात सध्या आरोग्य, फिटनेस, रोगप्रतिकार शक्ती, आयुर्वेद, स्वच्छता आणि सामाजिक आरोग्य हे विषय अग्रस्थानी आलेले आहेत. तरीही सार्वजनिक आरोग्याचा विषय म्हणावं तितका अजूनही लोकांना पटलेला नाही. कारण, वैयक्तिक किंवा कौटुंबिक आरोग्याकडे लक्ष देणारे आपण सगळे सार्वजनिक आरोग्य या विषयावर अजूनही गप्प आहोत. आपल्या भागातील सरकारी दवाखाने सोयी-सुविधा देत नसतानाही आपण सगळेच निवांत आहोत. अशावेळी या सुविधा सुधाराव्यात आपल्याला आणि समाजातील गरीब घटकांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा यासाठी आपण काहीही करताना दिसत नाहीत. एकूणच हे अजूनही भयावह आणि गंभीर चिंतेच्या गटात मोडणारे आहे. अशावेळी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.

  लेखक : माधुरी सचिन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here