‘त्या’ शेअर्सनी दिली महिन्यात ९० % ग्रोथ; वाचा परदेशी गुंतवणूकदारांच्या आवडत्या शेअरची ही बातमी

भारतीय शेअर बाजारातून पैसे कमावण्यासाठी मागील काही वर्षांपासून परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे ओतत आहेत. ते फ़क़्त पैसे ओततात असे नाही, तर मोठा पैसाही कमवीत आहेत. त्याचवेळी देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही आपला दबदबा कायम राखला आहे. उलट करोना आणि लॉकडाऊन काळात बाजारातील भारतीय गुंतवणूकदारांचा टक्का वाढत आहे. अशावेळी परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या आवडत्या स्क्रिप्टमध्ये फ़क़्त एकाच महिन्यात ९० % इतके पैसे कमावले आहेत.

फ़क़्त एकाच महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पासे थेट ९० टक्के वाढवल्याची बातमी इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या अर्थापत्राने दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विदेशी पोर्टफोलियो निवेशक (एफपीआई) सध्या भारतीय बाजारातील ग्रोथ लक्षात घेऊन मोठी गुंतवणूक करीत आहेत. परिणामी त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअरच्या किमती झपाट्याने वरच्या दिशेने निघालेल्या आहेत. बीएसईमधील (BSE) ५०० महत्वाच्या शेअर्सनी मागील काही कालावधीत मोठी वाढ नोंदवली आहे. ज्यामध्ये परकीय इन्व्हेस्ट आवडीने लक्ष घालतात असे शेअर तर झपाट्याने वाढत आहेत. अगदी कंपनीच्या आकड्याला बाजूला सारून या शेअर्सनी ग्रोथ पकडलेली आहे.

  वीए टेक वबाग यांचा शेअर ९० टक्के, आईडीएफसीचा ५२ टक्के, जिंदल स्टेनलेस (हिसार), श्रीराम सिटी यूनियन फाइनेंस आणि बिड़लासॉफ्ट (बिरला) यांच्यातही ४२ ते ५० टक्के, स्ट्राइड्स फार्मा, जी एंटरटेनमेंट, सनटेक रियल्टी, अडानी एंटरप्राइजेज, पीएनबी हाउसिंग फाइनेंस आणि ब्लिस जीवीएस फार्मा यांनीही ३०-४० टक्के, भारत फोर्ज, रेडिंग्टन (इंडिया), केपीआईटी टेक्नोलॉजीज, प्रस्टीज एस्टेट, टीमलीज सर्विसेज, द ग्रेट ईस्टर्न शिपिंग आणि पीवीआर यांनी २०-३० टक्के इतकी ग्रोथ नोंदवली आहे. त्याचवेळी मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना विशेष वाढ हाती आलेली नाही.

  शेअर बाजार म्हणजे सट्टाबाजार हे चित्र आता काहीसे बदलत आहे. अनेकजण यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून आपले पैसे वाढवण्यासाठी आता येत आहेत. अशा मंडळींनी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष ठेऊन इथे गुंतवणूक करावी. गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) आणि ट्रेडिंग यांची अजिबात गफलत करू नये. अनेकदा काही मोठ्या संस्था गुंतवणूक वाढवत नेऊन एखाद्या शेअरची रक्कम वाढवून ठेवतात. मात्र, त्यांनी त्यांचा प्रॉफिट बुक करण्याचा सीजन आळा की त्या कंपन्यांच्या शेअरचे भाव पुन्हा पडू शकतात. अशावेळी आपली गुंतवणूक बाजार कोणत्या दिशेने जातोय यापेक्षाही एकूण अर्थव्यवस्था आणि त्यातही आपण निवडलेली कंपनी कोणत्या पद्धतीने काम करीत आहे हे पाहून इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा.

  सध्या जगभरातील बाजार तितकेसे वाढत नसतानाच भारत आणि काही देशातील बाजारात मात्र मोठी तेजी आहे. त्याचवेळी बाजारात रॉबिनहूड गुंतवणूकदार (नवीन संधी शोधत आलेले आणि जिगरबाज) आपली गुंतवणूक वाढवत आहेत. त्यानेही अनेक महत्वाच्या आणि बिगर महत्वाच्या कंपनीचे शेअरही झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी कंपनीची आर्थिक स्थिती आणि भविष्याचे आडाखे बांधूनच गुंतवणूक करा. भावनेच्या भरात केलेली गुंतवणूक अनेकदा तोटा देते. तसेच सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही माहिती पेरून ठराविक कंपन्यांचे शेअर वाढवण्याचीही भीती आहेच की. अशावेळी आपल्याला आलेली ब्रेकिंग न्यूज पक्की आहे का आणि ती जर खोटी ठरली आणि आपले एकाच दिवसात लाखाचे बरा आजार झाले तर किती मोठा झटका आपण सहन करू शकतो हे लक्षात घेऊन निर्णय घ्या.

  संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here