फ़क़्त १६ वर्षांमध्ये ‘या’ कंपनीने दिला बम्पर मनी; १० हजारांचे झाले २१ लाख रुपये

टाटा सिर्फ नाम ही काफी है, असे आपण अनेकदा चर्चेत म्हटलेलो असतो. इतका या कंपनीच्या नाममुद्रेवर (brand) आपल्या सर्वसामान्यांचा विश्वास आहे. क्वालिटी नी व्यावसायिक नैतिकता याची ओळख म्हणूनच आपण सगळे टाटा सन्स आणि तिच्या सर्व कंपन्यांकडे पाहतो. कारण, मागील १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीत त्यांनी हीच ओळख पक्की केली आहे. काही कंपन्या मागून आल्या आणि जास्त पैसेवाल्या झाल्याही असतील. परंतु, विश्वास मात्र टाटा कंपनीने कमावला हे मान्य असेलच की..

तर, मित्र-मैत्रिणींनो, याच ग्रुपमधील टाटा कन्सल्टंन्सी लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिलेल्या पैशाची कथा आज आपण पाहणार आहोत. कारण त्यालाही निमित्त आहे. TCS नावाने जगभरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीला काळ दि. २५ ऑगस्ट रोजी १६ वर्षे पूर्ण झाले. थांबा, कंपनी सुरू होण्याला नाही. तर, शेअर बाजारात नोंदणीकृत होण्याला १६ वर्षे झालीत. तत्पूर्वीच ही कंपनी बाजारात आपली उत्तम आणि दर्जेदार सेवा देत होती. त्याचा जोरावर तत्कालीन गुंतवणूकदारांनी त्यावेळी शेअर बाजारात या कंपनीचा आयपीओ आल्यावर त्यावर जोरदार प्रतिसाद दिला होता. कारण, त्यात नाव होते टाटा ग्रुपचे. म्हणजेच विश्वासाचे.

  गुंतवणूकदार मंडळींचा विश्वास सार्थ ठरवून मग या कंपनीने मोठी प्रगती केली. आजही ही कंपनी मुंबई शेअर बाजारातील दुसऱ्या क्रमांकाची प्रमुख कंपनी आहे. काही वर्षे तिने प्रथम स्थानही पटकावले होते. मात्र, आपल्या १६ वर्षांच्या कालावधीत या कंपनीने अनेक चढ-उतार अनुभवले. तसेच गुंतवणूकदारांनीही यात सहभागी होत असे टक्केटोणपे खाल्ले. परंतु, त्याला आता १६ वर्षे उलटली आहेत. या १६ वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना भरभरून दिले आहे. अगदी त्यावेळी फ़क़्त १० हजार रुपये गुंतवणूक करून कधीही शेअर न विकालेल्यांना कंपनीने २१ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊन टाकले आहेत. होय, ही काही अफवा नाही. हे वास्तव आहे.

  ही कंपनी १९८६ मध्येच स्थापन झाली होती. टाटा ग्रुपला भविष्याचे चित्र दिसत असल्याने त्यांनी संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उडी घेतली. त्यावेळी कंपनी आपले काम करीत होती. मात्र, २००४ मध्ये कंपनीला वाटले की आता शेअर बाजारात जाऊन गुंतवणूक मिळवावी. त्यानुसार कंपनीचा आयपीओ जुलै २००४ मध्ये आला. त्यावेळी ७७५ ते ९०० रुपये या प्राईस बँड निश्चित करण्यात आला होता. अखेरीस ८५० रुपये इतक्या किमतीला शेअरचा भाव फिक्स होऊन गुंतवणूकदारांना हे शेअर देण्यात आले. त्यानंतर २५ ऑगस्ट २००४ ला कंपनीचा शेअर बाजारात नोंदला गेला आणि मग त्याची तिथून खरेदी-विक्री सुरू झाली. त्यावेळी २६ टक्के वाढीसह हा शेअर १०७६ रुपयांवर होता.

  त्यानंतर कंपनीने वेळोवेळी बोनस दिला आहे. त्या बोनसची रक्कम किती हे या बेरजेत धरलेले नाही. मात्र, चारवेळा कंपनीने एकास एक असा शेअर गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यानुसार त्यावेळी घेतलेल्या एका शेअरनुसार गुंतवणूकदारांनी जर शेअर विकला नसेल तर त्यांच्याकडे आता ८ शेअर असतील. म्हणजेच त्यावेळी ८५० ला घेतलेल्या शेअरची सख्या ८ अशी असल्याने ८ शेअर गुणिले सध्याच्या किमतीचा भाव असे गणित मांडले तर ही रक्कम त्यावेळच्या १० हजार रुपयांच्या तुलनेत थेट २१ लाखांपेक्षा जास्त होऊन जाते.

  म्हणजेच त्यावेळी ज्यांनी फ़क़्त ५० हजार रुपये गुंतवणूक केली होती. त्यांच्या पैशांची किंमत आता १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे. बँक किंवा जमिनीच्या क्षेत्रातही इतका मोठा लाभ मिळत नाही. इतकी बम्पर मनी कमावून देण्याची किमया या शेअरने करून दाखवली आहे.

  कंपनीचे काही महत्वाचे मुद्दे :

  एकूण टाटा ग्रुपमधील वाटा : किमान ८० टक्के

  कर्मचारी संख्या : ४.१७ लाख

  मागील १० वर्षात सलग किमान १६ टक्के इतकी ग्रोथ

  कंपनीची स्थापना : १९६८

  देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी

  संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here