ICCIC बँकेने आणली नवी योजना; पीककर्ज तातडीने देण्यासाठी सॅटेलाईटचा वापर

आयसीआयसीआय नावाच्या खासगी बँकेने देशातील शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याच्या वेळेतील अडचण दूर करण्यासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. सध्या या बँकेकडे पूर्ण प्रकरण दिल्यावर १५ दिवसांनी पिक कर्जाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. हाच वेटिंग पिरीयड कमी करण्यासाठी म्हणून बँकेने आता सॅटेलाईटचा वापर करून कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची तयारी केली आहे.

याबाबत बँकेचे कार्यकारी संचाकाल (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) अनुप बागची यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती देताना सांगितले आहे की, अशा पद्धतीची सेवा जाग्भारातील मोजक्याच बँक देत आहेत. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने बँकेने ही सेवा सुरू केली आहे. सॅटेलाईटचा वापर करून शेताची, तिथल्या पीकपद्धती ई इतर गोष्टींची माहिती काढली जाईल. एकूणच सर्च रिपोर्ट करण्याची ही खास पद्धत या बड्या खासगी बँकेने आणली आहे.

आयसीआयसीआय बँक ही शेती व ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करणारी एक महत्वाची खासगी बँक बनली आहे. ग्रामीण भागातील समस्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने भिडण्याची तयारी बँकेने केली आहे. आतापर्यंत या पद्धतीच्या सेवेद्वारे भारतातील ५०० गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलेले आहे. पुढील काळात सुमारे ६३ हजार गावांमध्ये अशी सुविधा देऊन क्रॉप लोनची सेवा विश्वासार्ह आणि वेगवान करण्याची तयारी बँकेने केली आहे.

भारतात सरकारी व सहकारी बँकाचे जाळे उत्तम आहे. मात्र, त्यांच्या सेवा आणि एकूणच शेतकरी व ग्रामीण भागाला त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक हीच डोकेदुखी बनली आहे. सेवेत कुचराई आणि अडकाठी घालण्यात सरकारच्या बँका अग्रेसर आहेत. हीच उणीव भरून काढण्यासाठी खासगी बँक उतरत आहेत. त्याचवेळी काही स्मॉल फायनान्स बँक येऊन महिला व शेतकरी गटांना मदत करीत आहेत. मात्र, त्यांचा व्याजदर हीच मोठी डोकेदुखी आहे. अशावेळी मध्यममार्ग म्हणून खासगी बँकाचे जाळे विस्तारत आहे. आयसीआयसीआय ही खासगी क्षेत्रातील अशीच एक महत्वाची बँक म्हणून पुढे येत आहे.

बँकेचे कर्ज घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागते त्याचे मुद्दे :

  • सर्वप्रथम कर्ज कशासाठी घ्यायचे आहे ते ठरवावे. ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले आहे. त्यामध्येच त्याचे पैसे गुंतवावे. कारण, मग परतफेड करताना त्यातून आलेल्या पैशातून करता याते. तसे नाही झाले तर मग परतफेड करण्याच्या एकूण साखळीवर दुष्परिणाम होऊन हे सायकल कोलमडते आणि मग बँक अशा खातेदारांना डिफॉल्टर म्हणून घोषित करते.
  • कर्ज घेण्यासाठी आपल्या नजीकच्या बँकेत संपर्क साधावा. अगोदरच त्या बँकेत आपले बचत किंवा चालू खाते असल्यास अशा बँकेमध्ये सर्वप्रथम संपर्क करवा. मात्र, अनेकदा जिथे खाते आहे तिथले अधिकारी सहकार्य करीत नाहीत. अशावेळी मग वरिष्ठांना भेटून मार्ग काढण्याच्या प्रयत्न करावा आणि ते नाहीच शक्य झाले तर नवीन बँकेकडे जावे.
  • बँकेला सर्व माहिती खरी व वस्तुनिष्ठ अशी द्यावी. ज्यासाठी कर्ज पाहिजे आणि परतफेड कशी करणार याची माहिती द्यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांची मदत घेऊन नियोजन करावे.
  • बोलणी पूर्ण झाली की सर्व लागणारी आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करून द्यावीत. कधीकधी आपण कर्जाचे बोलून घेऊन जास्त वेळ लावला तर अशावेळी वरिष्ठ कार्यालयाकडून नवीन कर्ज मंजूर न करण्याचे पत्रही येऊ शकते. मग आपले प्रकरण अडकून पडू शकते. त्यामुळे यामध्ये तातडीने अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
  • सर्व माहिती देऊन आपल्याकडे बोजा चढवण्यासाठी असणारी जमीन व मालमत्ता यांची माहिती देऊन सहकार्य करावे. मगच लवकरात लवकर कर्ज मिळू शकते.

हे मुद्दे जरी असले तरीही जर बँक अधिकारी व व्यवस्थापक यांनाच कर्ज मंजुरीचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी आडमुठेपणा केल्यास त्यावर आपण फ़क़्त तक्रार करू शकतो. त्याला दाद मिळेलच याची खात्री काही या देशात अजूनही कोणतेही सरकार किंवा सरकारी यंत्रणा देत नाहीत. हे आहे नेहमीसारखेच..!

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here