मस्त चविष्ट आंबावडी बनवा घरीच आणि गट्टमही करा की; वाचा अन शेअर करा रेसिपी

होय, वाचक मित्र-मैत्रिणींनो, आम्हालाही माहिती आहे हा आंब्याचा सीजन नाही. परंतु, आता काय सीजन लागतोय होय आपल्या जिभेची हाउस पुरवायला. आहो, नाहीच आंबा मिळत तर आंब्याची पावडर, अमरस किंवा इतर गोष्टी मिळतात की. त्यापासून आंबावडी बनवू की आपण आणि गट्टमही करून टाकू..!

सध्या आंब्याचा सिजन नाही. मात्र, आमरस किंवा इतर काही ब्रांड आंब्याचा रस देतात. आता लॉकडाऊन असल्याने बाहेरून कुठूनही काहीही खायला आणून का म्हणून डोकेदुखी वाढवायची? मग अशावेळी सगळेच पदार्थ घरी बनवून चवदार आणि सकस खाऊन इम्युनिटी पॉवर वाढवायलाही आंबावडी कामाची आहेच की. त्यामुळेच आंब्याची आवड असणाऱ्यांना चवदार खायला मिळावे म्हणून ही रेसिपी देत आहोत. कारण आता आंबा नाही पण आंबावडी आपण सगळेच खाऊ शकतो. आंब्याच्या सिजन गेल्यावरही तुम्ही आंबावडी खाऊन आंब्याची चव अनुभवू शकता.

तर कमी साहित्य आणि सोपी कृती असलेली आंबावडी करण्यासाठी हे साहित्य घ्या आणि कामाला लागा. वाचतानाच तोंडाला पाणी सुटले की काय? होय, मलाही लिहिताना अशी आंबावडी समोर ठेवलेली खायची लैच सवय आहे. मग तुम्हीही तिचा अनुभव घेऊन टाका आणि तृप्त व्हा.

  यासाठी लागणारे साहित्य : १ कप साखर, २ चमचे तूप, ३ चमचे पिठीसाखर, पिस्ता व बदामाचे काप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आंब्याचा रस. होय, त्यात आंबा महत्वाचा. कारण, तीच तर या खाद्यपदार्थाची खरी खासियत आहे.

  हे मोजके साहित्य घ्या आणि आंबावडी बनवायला लागा. पहिल्यांदा आंब्याचा रस आणि साखरेचे मिश्रण करून घ्या. हे मिश्रण गॅसवर एक कढई ठेवून घोटवावे. घेटवणे म्हणजे खावा करण्यासारखे नाही बरे. हलक्या हाताने हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवा. आता हे घट्ट झालेले मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा. गरेनुसार त्यात पिठीसाखर मिक्स करायला घ्या. असे केल्याने मग हे मिश्रण जरा कोरडे होईल. असे कोरडे झालेले मिश्रण लाटता येईल या पद्धतीने एकत्र करून घ्या. मग मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर लाटावा आणि मग वरटी मस्तपैकी ड्रायफ्रुट्स घालून त्याच्या वड्या पाडाव्यात.

  झाली तुमची चविष्ट आंबावडी तयार..! आता लगेच खायची नाही हा ही वडी. होय, म्हणजे खायची नाही असे नाही. तर, आपण खाण्यापूर्वी ती सगळ्या घरच्यांना वाटावी. त्यातूनच नात्याचा गोडवा वाढतो. अशा पद्धतीने नात्यातला आणि कौटुंबिक गोडवा वाढवूनच आपण सगळे झकास एकत्र मजेत राहू शकतो की..!

  आंबा या फळाचे आहारात खूप महत्व आहे. त्यामुळे आंब्याच्या सिजनमध्ये आंबे चापून खा. त्यासाठी ते कापून खा नाहीतर चोखून त्यातला रस पिऊन खा. अगदी कोपरापर्यंत वघूळ येउस्तोवर का होईना आंबे खाच. परंतु, वर्षभरात नियमितपणे बाजारात मिळणारा चांगल्या दर्जाचा अमरस किंवा पल्प यांच्या बॉटल आणूनही आंब्याचे बनवलेले पदार्थ खावेत. तब्बेतीला ते एकदम बेस्ट असतात. हेल्दी पदाथ खाऊनच आपण सगळे आजारांपासून दूर राहू शकतो. उगीचच खाताना काहीबाही खाण्यापेक्षा चवीला मधुर लागण्यासह आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते अशा पदार्थांना प्राधान्य द्या. आता आपल्याला नंतर सांगत असलेले कथापुराण बंद करते. कारण, तुम्ही अशी आंबावडी खाल्ली आणि खाऊ घातली तरच सगळ्यांच्या जीवनात गोडवा येणार आहे.

  संपादन : संचिता कदम

  +++++++

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here