जाणून घ्या पुष्पवैभवाचे महत्व; ‘वनराई’चा पुढाकार, वाचा अन आजच नोंदणी करा

महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. येथील जैवविविधता त्यामुळेच अनेकांना खुणावत असते. अशावेळी आपल्यालाच या महान वैभवाची माहिती नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच पश्चिम घाटातील म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील फुलांचे वैविध्य, त्यांचे वैशिष्ट्ये आणि त्यांचे औषधी उपयोग यांची माहिती देण्यासाठी वनराई या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने व प्रिंट मासिकाने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील ही संस्था पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करते.

याच संस्थेने फेसबुक पेजवर याबाबतचे एक आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारताच्या एकूण भूभागातील अवघ्या ५ टक्के भूभागावर पश्चिम घाट आहे. वितीर्ण पसरलेल्या या पश्चिम घाटात वैशिष्ट्यपूर्ण सपुष्प वनस्पतींच्या हजारो जाती-प्रजाती आढळतात. त्यांचे खास असे वैशिष्ट्ये आहेत. उपयोग आहेत. त्यापैकी काही प्रजाती तर अशा आहेत की ज्या फ़क़्त याच भागात आढळतात. त्या जगभरात इतरत्र कुठेच सापडत नाहीत. त्या खूप महत्वाच्याही आहेत. या सपुष्प वनस्पतींनी दरवर्षी बहरणाऱ्या कास पठाराला (सातारा जिल्हा) जागतिक वारसा स्थळाचा मानही मिळाला आहे. इतके याचे महत्व आहे. या भागातील अशा सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती कोणत्या आहेत याची ओळख आपल्याला असणे आवश्यक आहे. या वनस्पतीचे पर्यावरणीय महत्त्व आणि मानवाला होणारे उपयोग यासह त्यांच्या संवर्धन-संरक्षणाची गरज काय आहे याविषयी अधिक माहिती देण्याचा हा उपक्रम आहे. त्यासाठी संस्थेच्या फेसबुक पेजवरून शनिवारी (दि. २९ ऑगस्ट २०२०) ऑनलाईन सत्र घेण्यात येणार आहे. ‘वनराई’ आयोजित संवाद कार्यक्रमात ‘पश्चिम घाटातील पुष्पवैभव’ या https://www.facebook.com/vanarai/ सत्रात डॉ. शरद कांबळे हे माहिती देणार आहेत.

डॉ. कांबळे हे वनस्पती वर्गीकरण या विषयातील संशोधक आहेत. शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६.३० या तासाभराच्या सत्रात ते आपल्या पश्चिम घाटातील महत्वाच्या फुलांची माहिती देतील. यामध्ये ते पश्चिम घाटातील वनस्पती वैभव, अतिदुर्मिळ वनसंपदा, त्यांचे पर्यावरणीय महत्व आणि संवर्धनाची गरज याबाबतची माहिती देतील. तसेच आपण त्यांना त्याच सत्रात प्रतिक्रिया देऊन प्रश्नही विचारून घेऊ शकता. शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. कारण, ते हीच महत्वाची माहिती प्रसारित करणारे दुवा बनतील. पालक व इतर महिलांनीही यामध्ये सहभागी होऊन आपल्या राज्यातील जैवविविधता आणि तिचे महत्व समजावून घेण्याची ही खास संधी वनराई संस्थेने दिली आहे.

डॉ. कांबळे हे संशोधक असून त्यांनी भारतात आढळणाऱ्या १९ सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती शोधल्या आहेत. त्यांचे ६० पेक्षाही अधिक शोधनिबंध जागतिक स्तरावरील विविध मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी (चीन) यांच्याकडून त्यांना बेस्ट रिसर्चर हा पुरस्कार मिळालेला आहे. सध्या ते भारतात आढळणाऱ्या काही दुर्मिळ सपुष्प वनस्पतींवर संशोधन करीत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला घरबसल्या ज्ञानाचा खजिना वनराईने उघडला आहे. त्यासाठी त्यांचे फेसबुक पेज लाईक करून नियमितपणे होणाऱ्या कार्यक्रमाचा आणि प्रिंट व इअंकाची अंकाची वर्गणी भरून पर्यावरण क्षेत्रातील महत्वाच्या माहितीची ओळख आपण आपल्या पाल्यांना करून देऊ शकतो.

या कार्यक्रमाची आणि संस्थेच्या व वनराई मासिकाच्या इतर माहितीसाठी आपण अमित वाडेकर (मो. ७७२०० ५६७३८) या यांना संपर्क करू शकता.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here